ठाणे : जिल्हा परिषदेची इमारत धोकादायक झाली आहे. यातील काही कार्यालये अन्यत्र स्थलांतरितही झाली आहेत. इतर कार्यालयांसाठी एमटीएनएलच्या इमारतीत जागा भाड्याने घेण्याचे निश्चित झाले. त्यासाठी वार्षिक एक कोटी ६० लाख रुपये भाडे एमटीएनएलला देण्यास जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने सोमवारी मंजुरी दिली.जिल्हा परिषदेची मुख्य इमारत धोकादायक झालेली आहे. या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये, म्हणून सावधगिरीची उपाययोजना म्हणून आधीच या इमारतीमधील कार्यालयांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे. पण, या सर्व कार्यालयांना एकत्र आणणे अपेक्षित आहे. यासाठी मोठी प्रशस्त जागा भाड्याने घेणे गरजेचे असल्यामुळे जिल्हा परिषदेने चरई येथील एमटीएनएलच्या इमारतीमध्ये आवश्यक जागा भाड्याने घेण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत निश्चित करून तसा ठरावही केला आहे. यासाठी वर्षभरात सुमारे एक कोटी ६० लाख रुपये भाडे भरावे लागणार आहे. त्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात ही सर्वसाधारण सभेची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आदींसह सभापती व्यासपीठावर उपस्थित होते. वर्षभराच्या भाड्यापोटी द्याव्या लागणाऱ्या एक कोटी ६० लाख रुपयांचा हा ठराव आता राज्य शासनास पाठवून मंजुरी घेतलीजाणार आहे.सेस फंडातून ही भाड्याची रक्कम जिल्हा परिषद खर्च करणार आहे. परंतु, वर्षभरात नवी इमारत उभी राहणे शक्य नसल्याची चर्चादेखील सभागृहात झाली. नवी इमारत बांधण्याचा प्रस्तावही मंत्रालयात पडून आहे. यासाठी पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यास त्वरित मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले.>पंचायत समिती इमारतींची होणार दुरुस्तीमुख्य इमारतींच्या बांधकामासह इतर इमारतींच्या दुरुस्तीचाही प्रस्ताव सभागृहात मांडून त्यास मंजुरी घेण्यात आली. एवढेच नव्हे तर या इमारतींसाठी लागणाºया वास्तुविशारदाच्या नेमणुकीसाठीदेखील मंजुरी घेण्यात आली. यासाठी तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. मात्र, सद्य:स्थितीला ५० लाखांची तरतुदीला मंजुरी घेण्यात आली. इमारतीच्या बांधकामासाठी कल्याण पंचायत सतिमीच्या कार्यालयासह दुसºया इमारतीच्या दुरुस्तीसाठीही सभागृहाने मंजुरी दिली आहे. धोकादायक इमारतीतील पंचायत समितीची कार्यालयेही अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यास सभागृहाने एकमताने मंजुरी देत वर्षभरात इमारत बांधण्यासंदर्भात सदस्यांनी सूचना केली आहे.
जिल्हा परिषद एमटीएनएलला देणार वार्षिक दीड कोटी भाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:43 AM