सुरेश लोखंडे ।ठाणे : सुमारे दोन वर्षांपासून रखडलेली ठाणे जिल्हा परिषदेची निवडणूक लवकरच होऊ घातली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेचे गट व पाच पंचायत समिती गणांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.जाणकार अधिकारी, कर्मचाºयांची जुळवाजुळव करण्यात येत आहे. याबाबतचा आदेश निवडणूक आयोगाने जारी करताच जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.जिल्हा विभाजनानंतर दोन वेळा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही राजकीय पक्षांनी उमेदवार दिले नाही. यामुळे सदस्य संख्येअभावी जिल्हा परिषद व पंचायत समित्या अस्तित्वात आल्या नाही.सुमारे दोन वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर प्रशासक नियुक्त करून कामकाज सुरू आहे; पण ते आता लवकरच संपुष्टात येणार आहे. आरक्षणासह प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव तयार करण्यासह अंतिम प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि.ज. वागळे यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकाºयांना प्रारूप प्रभागरचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे १९ आॅगस्टपर्यंत सादर करावा लागणार आहे. या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांनी २४ आॅगस्टपर्यंत मान्यता देणे आवश्यक आहे.जिल्हाधिकाºयांना २९ आॅगस्टपर्यंत आरक्षण सोडतीची सूचना जाहीर करून प्रारूप प्रभागरचना, आरक्षण यावर हरकती, सूचना व दुरुस्त्या मागितल्या जाणार आहेत. त्यावर सुनावणी होऊन २६ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाºयांना अंतिम प्रभागरचना व आरक्षणाला शासकीय राजपत्रात प्रसिद्धी द्यावी लागणार आहे.या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ होऊन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यासाठी जिल्हा प्र्रशासन कामाला लागले आहे.>प्रभाग रचनेचे आदेश जारीराज्य निवडणूक आयोगाने ११ आॅगस्ट रोजी प्रपत्रक काढून ठाणे जिल्हा परिषदेसह पाच पंचायत समित्यांच्या प्रभागरचनेसाठी आदेश जारी केले आहेत. जिल्हा परिषदेचे ५३ गट, तर पंचायत समित्यांमध्ये १०६ गणांसाठी प्रभागरचना युद्धपातळीवर होत आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक लवकरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 3:22 AM