सुरेश लाेखंडे
ठाणे : मुंबईला लागून असलेला ठाणे जिल्हा नागरी, सागरी आणि डोंगरी दुर्गम भागात विस्तारला आहे. अतिशय झपाट्याने होत असलेल्या नागरिकरणामुळे देशात सर्वाधिक महानगरपालिकांचा जिल्हा म्हणून ठाण्याची ओळख आहे. येथील दुर्गम भागातील गावखेडे आणि पाड्यांमधील रहिवाशांच्या आरोग्याची काळजी ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग घेत आहे. लहान मोठे शहर आणि गावांमध्ये आरोग्य विभागाने आतापर्यंत १४ खासगी रुग्णालयांची नोंदणी झाली आहे. त्यात प्रसूती वार्डसह अन्य रुग्णांच्या २३९ खाटांना परवानगी दिलेली आढळून आली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील अग्नितांडवामुळे रुग्णालयांची सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जिल्हा परिषदेची स्वत:ची ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. याशिवाय जिल्हा परिषदेने १४ खासगी रुग्णालयांची नोंदणी बॉम्बे नर्सिंग ॲक्ट (२००५) नुसार करून, त्यांना वैद्यकीयसेवेची परवानगी दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नाेंदणी नसलेल्या रुग्णायांचे काय हा प्रश्न चर्चेचा झाला आहे.
फायर ऑडिटची शहानिशा गरजेची या रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या देखभाल, दुरुस्तीच्या उपाययोजना, फायर ऑडिट आदींची शहानिशा करण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. जेणेकरून रुग्णालयांमध्ये काेणतीही अनुचित घटना हाेणार नाही.
नोंदणी न केल्यास होणारी कारवाई गावांमध्ये रुग्णालय, दवाखाना सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडे नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्यांच्यावर बाॅम्बे नर्सिंग कायद्याखाली कायदेशीर कारवाई जि.प. आरोग्य विभागाद्वारे केली जाते. या कारवाईमुळे रुग्णालय, दवाखाना बंद करावा लागताे.
देखभाल-दुरुस्ती, फायर ऑडिटबाबत यंत्रणा सतर्कजिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत रुग्णालये, दवाखाने आदींची नोंदणी आरोग्य विभागाकडे आधीच केलेली आहे. त्यांच्या देखभाल, दुरुस्ती, सेवा, सुविधा आणि फायर ऑडिट आदींची पाहणी करण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क आहे. भंडारा येथील दुर्घटनेनंतर सुरक्षा यंत्रणेवर लक्ष केंद्रित करणार आहे. - सुभाष पवार, उपाध्यक्ष, जि.प., ठाणे
विषय गांभीर्याने घेणे आवश्यकजिल्ह्यातील या गाव, खेड्यांमधील २४० खाटांची १४ रुग्णालये व आरोग्य केंद्रांच्या सुरक्षेचा विषय गाभीर्याने घेण्याची गरज आहे.