ठाणे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत सर्व घरकुल योजनेत राज्यात अव्वल कामगिरी केल्याबद्दल ठाणे जिल्हा परिषदेला राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि. नेमाने, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते आणि तालुक्याचे गटविकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी स्वीकारला.आवास दिनाचे औचित्य साधत बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणाऱ्या शबरी, रमाई, आदीम आदी घरकुल योजना या शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत. ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मागील तीन वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्याला सात हजार २३८ घरे बांधण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. विविध अडचणींचा सामना करत सहा हजार ४९२ घरे बांधण्यात आली. त्यामुळे ८९.०७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. या योजनांतर्गत लाभार्थ्यांची आधारकार्ड जोडणी, बँक खाती पडताळणी यासह विविध कामांत ठाणे जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली.तालुक्यांची कामगिरी दमदारठाणे जिल्ह्यातील सर्व घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत पाच तालुक्यांपैकी तीन तालुके अव्वल ठरले आहेत. यामध्ये अंबरनाथ तालुक्याने ९२ टक्के, शहापूर तालुक्याने ९१.०५ टक्के, तर कल्याण तालुक्यात ९२.०२ टक्के घरकुलांचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांचादेखील गौरव करण्यात आला.कोकण विभागात अघई ग्रामपंचायत प्रथमशहापूर तालुक्यातील अघई ग्रामपंचायतीने घरकुल बांधण्याचा लक्ष्यांक साध्य करून कोकण विभागात प्रथम क्र मांक पटकावला. यावेळी या गावाचे ग्रामसेवक, सरपंच यांनाही सन्मानित करण्यात आले.पहिला हप्ता वितरितसन २०१९-२० साठी देण्यात आलेल्या १७४४ उद्दिष्टांपैकी १५५७ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना घरांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला.
घरकुल योजनेत जिल्हा परिषद राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:24 AM