ठाणे : जिल्हाभरात मनमानी करणाऱ्या पाणीपुरवठा अभियंत्यास टंचाई काळात अमेरिका दौरा करण्यास परवानगी का दिली, असा सवाल विचारणा-या जि.प. अध्यक्षांना अधिकाराची जाणीव करून देणारे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्याविरोधात सर्व सदस्यांनी एकत्र येऊन बुधवारी सर्वसाधारण सभेत एकमुखी ठराव घेतल्याचे ठाणे जि.प च्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी सांगितले.पाणीटंचाईच्या काळातील ५६ लाखांची बिले न मिळाल्यामुळे टँकरने होणारा पाणीपुरवठा थांबवण्यात आला होता. शिवाय अभियंता राऊत अमेरिका दौºयावर गेले. टंचाईच्या काळात गेल्याबाबत त्यांना जल व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विचारणा केल्यावर तो माझा अधिकार असल्याचे सीईओ यांनी सांगितले. या विषयी सर्वसाधारण सभेत सदस्यांनी सभागृहात एकच गोंधळ करून ठराव घेतल्याचे जाधव यांनी सांगितले. आता राऊत यांना अमेरिकेला जाण्यासाठी रजा दिली आहे. सीईओ त्यांना का पाठीशी घालत असल्याची विचारणा सदस्यांकडून होत आहे. राऊत विरोधातील तक्र ारी सीईओ ऐकून घेत नाहीत, त्यामुळे सदस्यांनी ठराव घेऊन राग व्यक्त केला आहे, असे जाधव यांनी सांगितले .प्रशासनाकडून सदस्यांची कामे करण्यास टाळाटाळ केली जात असल्यामुळे त्रस्त सदस्यांनी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा अभियंत्यास अमेरिका दौºयावरून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अभियंत्याच्या थेट अमेरिका वारीवर सत्ताधाºयांनी संशय व्यक्त केला. त्याचे स्थायी समिती बैठकीत शुक्र वारी पडसाद उमटले. हा अधिकारी अमेरिकेत कसा गेला, त्याचा पासपोर्ट व बँकेचे पासबुक मागवा, अशी मागणी अध्यक्षा जाधव यांनी केली. मात्र, कर्मचाºयांच्या वैयक्तिक दौºयाची माहिती मागण्याचा अध्यक्षांना अधिकार नसल्याचे स्पष्ट करन भीमनवार यांनी विरोध केला. त्या सभेतही अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाºयांची खडाजंगी झाली. प्रशासनातील अधिकारी सुचनांची अंमलबजावणी करीत नसल्याचा आरोप अध्यक्ष जाधव यांनी केल्यावर खळबळ उडाली. अध्यक्षांच्या आरोपाला अन्य सभापतींनीही अनुमोदन दिले. सांगितलेली कामे अधिकारी टाळत असल्याचा आरोप सभागृहात सभापतींनी केल्यामुळे सदस्यांनाही धक्का बसला.>प्रशासनावर हवे नियंत्रणसत्ताधाºयांचे प्रशासनावर नियंत्रण नसल्यामुळे नागरिकांना ढिसाळ कारभाराचा त्रास सोसावा लागत असल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे.जि.प.च्या कारभाराचा खेळखंडोबा असल्याचा आरोप भाजपा सदस्यांनी केली.
सीईओंविरोधात जिल्हा परिषदेचा ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 3:15 AM