ठाणे : दुर्गम क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तीन वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत शिक्षकांना शासनाच्या नव्या धोरणांमुळे यापुढे मोठा दिलासा मिळणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्ह्यात अवघड क्षेत्रातील २४८ शाळांत कार्यरत शिक्षकांना आता पसंतीची शाळा निवडण्याची संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात सर्वाधिक शहापूर आणि मुरबाडमध्ये दुर्गम क्षेत्रात शाळा आहेत.नव्या सुधारित धोरणात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठी दुर्गम आणि सर्वसाधारण असे दोन क्षेत्रांत अशी विभागणी केली आहे. दुर्गम क्षेत्रात ज्या शाळा मुख्यालयापासून दूर, दळणवळणाचे कोणतेही साधन नाही तसेच डोंगरी भागात आहेत. मुख्य रस्त्यापासून ३ किमीपेक्षा जास्त अंतर पायी चालावे लागते, वाहतुकीची सुविधा नाही. काही तालुक्यांतील शाळांवर रेल्वे रुळांमधून अर्धा तास तसेच जंगलातून चालत जावे लागते. पावसाळ्यात पुरामुळे रस्ता बंद होतो. अशा शाळांचा यात समावेश केला आहे. (प्रतिनिधी)
जि.प. शाळा शिक्षकांना दिलासा
By admin | Published: April 29, 2017 1:37 AM