शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

‘त्या’ शिक्षकांना जि.प. सदस्यांचा पाठिंबा; वेतनश्रेणी बंद करण्यास विरो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 2:01 AM

फसवणूक केलेल्या शिक्षकांना शिक्षण समितीचे अभय

ठाणे : ऑनलाइन बदल्यांद्वारे संवर्ग-२ द्वारे सोयीची शाळा मिळवण्यासाठी शाळेच्या अंतराची चुकीची व खोटी माहिती देऊन जिल्ह्यातील ६४ शिक्षकांनी प्रशासनाची फसवणूक केली. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने धडक कारवाई करून त्यांची एक वेतनश्रेणी कायमची बंद केली. मात्र, शुक्रवारी पार पडलेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी ठराव घेऊन या कारवाईला विरोध दर्शविला.

‘फसवणूक करणाºया ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी कायमची स्थगित’ या मथळ्याखाली लोकमतने २८ जानेवारी रोजी वृत्त प्रसिद्ध करून बदल्यांमधील हा घोळ उघडकीस केला. यामुळे शिक्षकवर्गात एकच खळबळ उडाली. त्यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे दरवाजे ठोठावले. यानुसार, शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. त्यात शिक्षकांची वेतनश्रेणी स्थगित केल्याच्या विषयावर सदस्यांनी जोरदार चर्चा करून शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, राज्य शासनाच्या अध्यादेशास अनुसरून ही कारवाई झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बदल्यांसाठी शिक्षकांना मार्गदर्शन केलेले नाही. तरी पण दोन ते तीन किलोमीटरचे अंतर जादा दाखवणाºया शिक्षकांवरील कारवाई रद्द करावी, यासाठी सर्व सदस्यांनी एकमताने ठराव घेऊन शासनास पाठवण्याचे निश्चित केले, असे शिक्षण समिती सदस्य सुभाष घरत यांनी निदर्शनात आणून दिले.

ठरावाची अंमलबजावणी झाल्यास शिक्षक सुटण्याची शक्यता

मुख्यालयापासून ३० किमीचे अंतर ग्राह्य धरून पतीपत्नी एकत्रीकरणाच्या सवलतीखाली शिक्षकांनी सोयीच्या शाळेवर बदली घेतली. यासाठी त्यांनी रेल्वेचे अंतर या बदलीसाठी वापरले. मात्र, प्रशासनाच्या नियमानुसार गुगल मॅपनुसार शाळेचे अंतर निश्चित करणे अपेक्षित आहे.

गुगल मॅपचा निकष न वापरल्यामुळे या शिक्षकांनी बदलीसाठी दिलेले अंतर चुकीचे असून त्यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचे ग्राह्य धरून प्रशासनाने तब्बल ६४ शिक्षकांची एक वेतनश्रेणी कायमची बंद केली आहे. या शिक्षेमुळे या शिक्षकांचे मोठे नुकसान होणार आहे.च्शिक्षेतून स्वत:ची सुटका करण्यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडे धाव घेऊन शिक्षण समितीच्या बैठकीत कारवाईविरोधात ठराव घेतला. या ठरावानुसार कारवाई मागे घेतल्यास बहुतांशी सर्वच शिक्षक यातून सहीसलामत सुटण्याची शक्यता आहे.

दाखल्यांची फेरतपासणी सुरू

पतीपत्नी एकत्रीकरणाच्या सवलतीचा लाभ घेतलेल्या व कारवाईस पात्र ठरलेल्या ६४ शिक्षकांसह वैद्यकीय दाखले देऊन सोयीची बदली घेतलेल्यांमध्ये बहुतांश शिक्षकांनी बनावट दाखले दिल्याचे सांगितले जाते. त्यानुसार १५३ शिक्षकांच्या दाखल्यांची फेरतपासणी सुरू आहे. त्यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार आहे. कारवाईस पात्र ठरलेल्या शिक्षकांची बदलीच रद्द करून त्यांना पूर्वीच्या शाळेवर पाठवण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचा एक गट जिल्ह्यात सक्रिय होत आहे. यामुळे शिक्षण समितीच्या ठरावाचादेखील फज्जा उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत

या शिक्षकांची वेतनश्रेणी स्थगित केली, तरी त्यांचे फारसे नुकसान होत नाही. त्यांना मिळणाºया वेतनामध्ये शहरी भागाच्या भत्त्याची मोठी वाढ झालेली आहे. या रकमेचा मोठा लाभ या शिक्षकांना होत आहे. तरीही, कायदेशीर कारवाई स्थगित केल्यास त्याविरोधात शिक्षक न्यायालयात जाऊन दाद मागण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी काही शिक्षकांनी एकत्र येऊन केवळ वेतनश्रेणी स्थगित न करता त्यांना पूर्वीच्या शाळेवर पाठवण्याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र