लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : शिवमंदिर जवळील रिलायन्स कॉम्प्लॅक्स समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण कोणी केले आणि त्याच्या बदल्यात बिल्डरला पालिका टीडीआर देणार का, या प्रश्नावर अंबरनाथ नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सविस्तर चर्चा होऊनही व बिल्डरला टीडीआर दिला जाणार नाही, असे मुख्याधिकाºयांनी स्पष्ट करुनही इतिवृत्तात याबाबत एकही ओळ नोंदलेली नाही. त्यामुळे नगरपालिकेचे इतिवृत्त आपल्या सोयीनुसार मॅनेज केले जात असल्याचा आरोप सदस्य करु लागले आहेत.काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचा टीडीआर घेण्यासाठी काही बांधकाम व्यवसायिक प्रयत्नशील आहेत. त्यांना साथ देण्याचा प्रयत्न पालिकेने सुरु केला आहे. त्यामुळेच गेल्या सर्वसाधारण सभेत या रस्त्याच्या मोबदल्यात कोणताही टीडीआर दिला जाणार नाही हे तत्कालीन मुख्याधिकाºयांचे आश्वासन आणि याबाबत विचारलेले प्रश्न अशी तब्बल १० मिनिटांची या विषयावरील चर्चा होऊनही इतिवृत्तात त्याचा उल्लेख केला गेलेला नाही.अंबरनाथ पालिकेची सर्वसाधारण सभा २९ एप्रिल रोजी झाली. त्यामध्ये मनसेच्या नगरसेविका आणि तत्कालीन नगररचना विभागाच्या सभापती अपर्णा भोईर यांनी शिवमंदिर जवळील रिलायन्स कॉम्प्लॅक्स समोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण कोणी केले आणि त्याच्या मोबदल्यात पालिका टीडीआर देणार का असा प्रश्न केला होता. हा रस्ता पालिकेच्या ताब्यात नसून त्या ठिकाणी खाजगी बांधकाम व्यावसायिक रस्ते काँक्रिटीकरण करीत होता. या काँक्रिट रस्त्याच्या मोबदल्यात बिल्डरला टीडीआर देण्याची शक्यता असल्याने सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नाला उत्तर देतांना मुख्याधिकारी गणेश देशमुख यांनी सांगितले की, या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने संबंधितांना ते काम रोखण्याचे आदेश दिले आहेत. रस्त्याच्या मोबदल्यात कोणताही टीडीआर दिला जाणार नाही. तसेच या रस्त्यासंदर्भातील अहवाल तयार करुन भविष्यातही या रस्त्याच्या कामाचा टीडीआर घेतला जाणार नाही, अशी व्यवस्था निर्माण केली जाईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले होते. इतिवृत्तात या चर्चेचा उल्लेख येणे अपेक्षित होते. मात्र एवढ्या महत्वाच्या विषयावरील चर्चेची एकही ओळ इतिवृत्तात नोंदलेली नाही. हे इतिवृत्त बुधवार ९ आॅगस्ट रोजी होणाºया सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या रस्त्याचा टीडीआर लाटण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिकांनी अधिकाºयांना हाताशी धरल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मुख्याधिकाºयांनी दिलेले आश्वासन हे इतिवृत्तातून वगळल्याचे बोलले जाते.मुख्याधिकारी देशमुख यांची बदली झाल्याने प्रभारी पदभार असलेल्या मुख्याधिकाºयांना हाताशी धरुन पालिकेतील काही अधिकारी हा टीडीआर बांधकाम व्यवसायिकाला देण्याकरिता धडपडत असल्याचा आरोप केला जात आहे.आजची सभा गाजणारमुख्याधिकारी देशमुख यांची बदली झाल्याने प्रभारी पदभार असलेल्या मुख्याधिकाºयांना हाताशी धरुन पालिकेतील काही अधिकारी हा टीडीआर बांधकाम व्यवसायिकाला देण्याकरिता धडपडत असल्याचा आरोप होत आहे.भविष्यात रस्त्याचा टीडीआर देतांना मुख्याधिकाºयांच्या सभागृहातील आश्वासनाचा अडसर ठरणारा लेखी पुरावा इतिवृत्तामुळे तयार होऊ नये याकरिता हा खटाटोप केल्याचे बोलले जाते. उद्याच्या सर्वसाधारण सभेत हा विषय गाजण्याची चिन्हे दिसत आहेत.
रस्त्याचा टीडीआर देण्याकरिता इतिवृत्तातच केला झोल झोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 6:08 AM