भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.