अधिक मास किंवा मलमास म्हणजे असा महिना, ज्यात सूर्यसंक्रांत होत नाही. अर्थात, सूर्याचा राशीबदल होत नाही. अशा अतिरिक्त आलेल्या महिन्याला कोणीही स्वामी नसल्याने 'मलमासाने' भगवान महाविष्णूंना आपली जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यदेखील केली. म्हणून दर तीन वर्षांनी येणाऱ्या 'अधिक मासाला' भगवान विष्णूंच्या नावे 'पुरुषोत्तम मास' असेही संबोधिले जाते.