न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेलनं ( Ajaz Patel) भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटीत स्पेशल क्लबमध्ये स्थान पटकावले. मुंबईत जन्मलेल्या एजाझनं वानखेडेवर टीम इंडियाचा पहिला डाव एकट्यानं गुंडाळला. त्यानं ११९ धावा देताना १० विकेट्स घेतल्या आणि कसोटीच्या एका डावात असा पराक्रम करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्या क्लबमध्ये एजाझचं नाव दाखल झालं आहे. २१ ऑक्टोबर १९८८मध्ये मुंबईत जन्मलेला एजाझ ८ वर्षांचा असताना कुटुंबीयांनी न्यूझींलड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.