दरवर्षी ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या समस्या त्यांच्या आयुष्यातील मुद्दे जाणून घेण्यासाठी त्याकडे लक्षवेधण्यासाठी आजच्या स्पर्धेच्या जगात ५०% जनतेला एखाद्या आंतरराष्ट्रीय दिवसाची गरज भासत असेल, तर मग आपला विकास खरंच झाला आहे असं म्हणायचं का? महिलांचे मुद्दे, समस्या नक्की काय आहेत? त्यांच्यानिर्मूलनासाठी आपण काय करू शकतो?असे अनेक प्रश्न आणि काही उत्तर घेऊन आम्ही येत आहोत. तेव्हा या मोहिमेत तुम्हीही सहभागी व्हा आणि बाईला माणूस म्हणून जगता यावं यासाठी तुमचाही थोडा हातभार लावा.