भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत.