'छावा' चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित असून १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकरही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारलीय.