सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'क्राइम पेट्रोल' कार्यक्रमाने देशाला हदरवून सोडणार्या गुन्ह्यांची प्रकरणे लोकांसमोर निरंतर आणली आहेत आणि धोक्याच्या सूचना ओळखून लोक स्वतःचे रक्षण कसे करू शकतात याबाबतीची जागरूकता पसरवण्याची जबाबदारी हा कार्यक्रम निभावतो आहे. मे 2003 मध्ये हा कार्यक्रम सुरू झाला होता, जो गुन्हेगारी विषयावरचा सुरुवातीचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाने झालेले नृशंस अपराध आणि त्यानंतर त्यासंबंधात मिळालेला न्याय याबाबत जागरूकता पसरवून सर्व वयोगटातील लोकांना यशस्वीरीत्या सक्षम केले आहे. या कार्यक्रमाने 1000 भाग यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.