फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं.