दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. 6 ऑगस्ट रोजी जपानमधील हिरोशिमा आणि 9 ऑगस्ट 1945 रोजी नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यांमध्ये सुमारे दीड ते दोन लाख जपानी नागरिक मारले गेले होते.