वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.