कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षानं उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. अमेरिका निवडणुकीत हॅरिस यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षाच्या माईक पेन्स यांचं आव्हान आहे. मूळ भारतीय वंशाच्या हॅरिस यांनी कॅलिफॉर्नियाच्या ऍटॉर्नी जनरल म्हणून काम केलं आहे. २०१७ पासून त्या कॅलिफोर्नियाच्या खासदार (सिनेटर) आहेत.