Kolhapur Municipal Corporation Election 2022 कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी यावर्षी ३१ प्रभाग असून सदस्य संख्या ९१ इतकी आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ३२, राष्ट्रवादीचे १२, भाजप-ताराराणी आघाडीचे ३३ इतके संख्याबळ होते. शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला होता. त्यामुळे मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांची महापालिकेवर सत्ता राहिली. राज्यातील महाविकास आघाडीचा पहिला प्रयोग कोल्हापूर महानगरपालिकेत सन २०१५ मध्ये यशस्वी झाला.