27 जुलैचं चंद्रग्रहण हे शतकातील सर्वात मोठं चंद्रग्रहण आहे. ग्रहणाचा एकूण कालावधी ३ तास ५५ मिनिटं असून सुमारे एक तास चंद्र खग्रास अवस्थेत असेल. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रग्रहण म्हटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार आहे.