१९९५ मध्ये महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिवसेना-भाजपा युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांनी कार्यभार सांभाळला. महापौर आणि ते मुख्यमंत्री आणि पुढे लोकसभेचं सभापती अशी जोशी सरांची यशस्वी राजकीय कारकीर्द. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार आणि अजातशत्रू नेते ही मनोहर जोशी यांची ओळख. २३ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांचं निधन झालं.