‘उमराव जान’, ‘कभी-कभी’ यांसारख्या चित्रपटांमधून अजरामर संगीताची अमूल्य भेट श्रोत्यांना देणारे ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे 19 आॅगस्ट 2019 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 'कभी-कभी' (१९७२) आणि उमराव जान (१९८१) या चित्रपटांमधील अविस्मरणीय संगीताने त्यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवलं. नूरी, रझिया सुलतान, बाजार यांसारखे चित्रपट खय्याम यांच्या संगीताने अजरामर झाले. पद्मभूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. २०१० मध्ये खय्याम यांना संगीतक्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला.