अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिप्रदेपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवी दुर्गाची प्रतिमा किंवा मूर्ती तसेच घटस्थापना केली जाते. त्यानंतर नवरात्रीचा उत्सव सुरु होतो. थोडक्यात सांगायचे झाले तर, नवरात्र म्हणजे आश्विन शु. प्रतिपदा ते नवमी या कालावधीत देवीची उपासना करताना केले जाणारे विधि, कुलधर्म, उपवास, पूजाअर्चा होय.