‘लोकमत’ कुपोषण या गंभीर समस्येवर सिटीझनस अलायन्स अगेंस्ट मलन्यूस्ट्रीशियन, युनिसेफ आणि हॉवर्ड टी. एच. चॅन स्कूल आॅफ पब्लिक हेल्थ-इंडिया रिसर्च सेंटर यांच्यासोबत ‘पोषण परिक्रमा’ उपक्रम राबवत आहे. यामध्ये ‘लोकमत’चे राज्यभरातील निवडक बातमीदार कुपोषणावर काम करून या समस्येच्या मुळापर्यंत जाऊन त्याच्यावर योग्य उपाय शोधणार आहेत. राज्यात कुपोषणावर मात केलेल्या यशस्वी प्रयोगांची देखील दखल घेतली जाणार आहे. तसेच राज्यभरातून एकत्रित माहितीवर काम केल्यानंतर कुपोषण निर्मुलनासाठी ठोस आराखडा तयार करून तो राज्य सरकारला देण्यात येणार आहे.