स्टीव्ह जॉब्स हे एक अमेरिकन व्यवसायिक होते आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचे सहसंस्थापक व मुख्याधिकारी होते. त्यांनी नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.