स्वाइन फ्लूला स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू असंही म्हटलं जातं. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणाऱ्या तापाच्या या प्रकाराची लक्षणं मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो.