अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे.