दरवर्षी 2 फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिन साजरा केला जातो. पाणथळ जागा आणि त्यांचे संवर्धनासाठी जागृती व्हावी आणि जैवविविधता जोपासली जावी हा यामागील उद्देश आहे. दलदल जागा, नद्या, जलाशय, धरणे, कालवे, बंधारे समुद्रकिनारे यांचे संवर्धनासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहे. यावर्षी 'पाणथळ जागा जैवविविधता' अशी संकल्पना निवडण्यात आली आहे.