भारतातीलच काय परदेशालीतही पर्यटकांना गोव्याला फिरायला जायचं असतं. अनेक लोक पुन्हा पुन्हा गोव्याला जाऊन मजा करतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे प्रत्येकालाच आकर्षित करतात. पण केवळ समुद्र किना-यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात बघण्यासाठी समुद्रकिना-या व्यतिरिक्तही अनेक आकर्षक ठिकाणं आहेत.
अर्वलेम लेणी
अर्वलेम लेण्यांचा उल्लेख पुराणातही आढळतो. या लेण्या पणजीपासून 31 किमी दूर आहे. असे म्हणतात की, पांडव याच लेण्यांमध्ये काही काळ थांबले होते. या लेण्या पांडवांची गुहा या नावानेही ओळखली जाते.
बिग फूट म्युझियम
गोव्यातील बिग फूट म्युझियम हे असंच एक वेगळा आनंद आणि अनुभव देणारं ठिकाण आहे. इथे तुम्हाला गोव्यातील पिढीजात गोष्टींच्या पाऊलखुणा बघायला मिळती. गोव्याची कला-संस्कृती इथे बघायला मिळेल.
बमनबुडो धबधबा
बमनबुडो धबधबा हा गोव्यातील प्रसिद्ध धबधबा असून कॅनाकोना तालुक्यात आहे. डोंगर द-यातून जंगलात खळखळत जाणारा हा धबधबा पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतो.
मयेम तळं
(Image Credit: ItsGoa)
सतत समुद्राचं पाणी बघून कंटाळा आला असेल तर तुमच्यासाठी इथे एक खास मयेम तळं आहे. पणजीपासून हे तळं केवळ 35 किमी अंतरावर आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर स्पोर्टही करायला मिळतील.
सलीम अली अभयारण्य
(Image Credit:Trawell.in)
सलीम अली अभयारण्यात तुम्हाला पक्षांच्या वेगवेगळ्या प्रजाती बघायला मिळतील. इथे पर्यटक ऑक्टोबर ते मार्च महिन्यात आवर्जून भेट देतात.
तेरेखोल किल्ला
(Image Credit: Askmen India)
तेरेखोल किल्ला हा वेंगुर्ला तालुक्यात येतो. १७ व्या शतकात सावंतवाडी संस्थानचे महाराज खेम सावंत भोसले यांनी तेरेखोल किल्ला बांधला. १७६४ साली हा किल्ला पोर्तुगीजांनी ताब्यात घेतला. तेरेखोल गाव जरी वेंगुर्ला तालुक्यात येत असलं तरी हा किल्ला मात्र सध्या गोवा सरकारच्या ताब्यात आहे. सध्या किल्यात एक आलिशान हेरिटेज हॉटेल बांधण्यात आल असून किल्यात प्रवेश निवडक लोकांनाच मिळतो.
नेत्रावली बुडबुडी तळं
(Image Credit: Inditales)
नेत्रावली बुडबुडी तळं हे गोवा-कर्नाचक सीमेजवळ आहे. पणजीपासून हे ठिकाण 90 किमी अंतरावर आहे. हे 300 ते 400 वर्ष जुनं तळं असून त्याला बबल लेक ऑफ गोवा, बुडबुडी तळं आणि बुडबुडी तळी या नावानेही ओळखलं जातं.
चोरला घाट
चोरला घाट हा गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर आहे. पणजीपासून हा घाट 50 किमी अंतरावर आहे. हा घाट सह्याद्री पर्वत रांगांचा भाग आहे. हिरवीगार डोंगर द-यांनी हा भाग व्यापलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला चांगला वेळ घालवता येईल.
कुंबरजुआ कालवा
पणजीपासून केवळ 20 किमी अंतरावर हे ठिकाण असून पर्यटकांची इथेही मोठी गर्दी असते. पण इथे तुम्हाला शांतता अनुभवायला मिळेल.
तांबडी सुरला
तांबडी सुरला येथील महादेव मंदिर हे चांगलंच प्रसिद्ध आहे. हे मंदिर भगवान महाविर अभयारण्यातील हिरव्यागार झाडांच्या मधोमध झाकलं गेलं आहे. 12 शतकातील हे मंदिर एरा दगडात कोरण्यात आलेलं आहे. रामचंद्र या यादव राजाचा मंत्री हेमाद्रीने हे मंदिर बांधलं आहे. हे मंदिर पणजीपासून 65 किमी अंतरावर आहे.