उंच-उंच डोंगर आणि त्यांच्यावर पसरलेली हिरवीगार झाडं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसं आहे. हिरव्यागार सुंदर घाटांमध्ये पसरलेले कॉफी आणि चहाचे मळे, संत्र्यांच्या बागा पाहणं म्हणजे, स्वर्ग सुखचं. अशा सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. भारतातही अनेक सुंदर ठिकाणं आहेत. ज्यांना परदेशातील ठिकाणांच्या उपमा देण्यात आलेल्या आहेत. अनेक ठिकाणांना स्कॉटलॅन्ड असं तर काहींना मिनी काश्मिर असंही संबोधलं जातं.
कुर्ग, कर्नाटक
कर्नाटकातील पश्चिमी घाटावर वसलेला एक जिल्हा ज्या कुर्ग किंवा कोडागु असं म्हणतात. येथे चारही बाजूंना निसर्गसौंदर्य पसरलेलं दिसेल. येथे निसर्गसौंदर्यासोबतच पाहण्यासाठी खूप काही आहे. जर तुम्ही कुर्गमध्ये फिरण्यासाठी जात असाल तर या ठिकाणी जायला विसरू नका.
राजा की सीट
कुर्ग हिल स्टेशनमध्ये एक ठिकाण असं आहे ज्याला राजा की सीट असं म्हटलं जातं. या ठिकाणावर कुर्गचे राजा संध्याकाळी सुर्यास्त पाहण्यासाठी जात असतं. तुम्हीही एका संध्याकाळी सूर्यास्ताचं दृश्य अनुभवण्यासाठी जाऊ शकता. हा अद्भूत नजारा तुम्हीही कधीही विसरू शकत नाही.
अब्बे फॉल
अब्बे वॉटर फॉल हा सुंदर चहाच्या बागांमध्ये स्थित आहे. याच्या आजूबाजूला खूपसारी सुंदर ठिकाणे आहेत. त्यामुळे इथे भेट देणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. डोंगरावरुन खाली कोसळणारं पाणी डोळ्यांचं पारणं फेडतात आणि मनालाही वेगळाच आनंद देऊन जातं. यासोबतच येथील इरुपू फॉल्सही आवर्जून बघावा असाच आहे. इथे एक पवित्र मंदिरही आहे.
इरप्पू फॉल
भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांमध्ये समाविष्ट असणारा हा घाट आपल्या अनोख्या सौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे एक इरप्पू फॉल असून यांच सौंदर्य पाहून तुम्हीही हैराण व्हाल. हा झरा पुढे जाऊन लक्ष्मणतीर्थ नदीला मिळतो. त्यामुळे याला पवित्र मानलं जातं त्यामुळेच अनेक लोक येथे येत असतात.
दुबारे एलिफंट कॅम्प
जर तुम्हाला हत्तीसारख्या विशाल प्राण्यांना भेट द्यायची असेल तर येथे तुम्ही नक्की जा. येथे हत्तीना प्रशिक्षण देण्यात येतं. तुम्ही येथे येऊन त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता.
बयालकुप्पे
हे भारतातील दुसंर सर्वात जास्त तिबेटी लोकसंख्या असणारं ठिकाण आहे. चारही बाजूंनी मठांनी वेढलेलं हे ठिकाण तुम्हाला अध्यात्मिक जगामध्ये घेऊन जाईल. येथील सर्वात प्रसिद्ध मठ आहे नमद्रोलिंग जो सुंदर बाग-बगिच्यांनी वेढलेला आहे.