(Image Credit:Livingit)
तुम्ही या विकेंडला किंवा या उन्हाळ्यात कधीही ट्रेकिंगला जाण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी ठिकाण शोधत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. कारण आम्ही तुमच्यासाठी ट्रेकिंगला जाण्यायोग्य काही खास ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत.
1) कळसुबाई शिखर
कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर आहे.समुद्रसपाटीपासून त्याची उंची ५४०० फूट म्हणजे सुमारे १६४६ मीटर आहे. ट्रेकिंग चा छंद असेल तर भेट द्यायला उत्तम ठिकाण.
2) सांधन व्हॅली
इगतपुरीतील सांधन व्हॅली हे ट्रेक करणा-यांसाठी लोकप्रिय ठिकाण. इथे 200 फुट खोल दरी आहे. त्यामुळे ट्रेकर इथे मोठ्याप्रमाणात आकर्षित होतात.
3) रतनगड किल्ला
अकोले तालुक्यातील हे ठिकाण समुद्रसपाटीपासुन ३५२३ फुट उंच आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी रतनवाडीला पोहचायला हवे. रतनवाडीस संगमनेरहुन अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
4) हरिहर किल्ला
इगतपुरी जवळीत ट्रेकिंगसाठीचं आणखी एक चांगलं ठिकाण म्हणजे हरिहर किल्ला. इथेही तुम्ही ट्रेकिंगचा मनमुराद आनंद घेऊ शकता.
5) लोहगड किल्ला
लोहगड हा लोणावळ्या जवळील एक प्रसिद्ध किल्ला आहे. या किल्ल्याची उंची ३४२० फूट इतकी आहे.
6) तुंग किल्ला
११ जून १६६५ रोजी झालेल्या पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तुंग हा एक किल्ला होता. या किल्ल्याची उंची ३,००० फूट इतकी आहे.
7) नाणेघाट
पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ हा घाट आहे. हा घाटही ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध आहे.