शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

बादशाह अकबरने आपला मुलगा सलीमला 'या' किल्ल्यात ठेवलं होतं नजरकैदेत, जाणून घ्या कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 12:42 PM

Alwar Fort : १ हजार फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचं निर्माण हसन खान मेवाती यांनी केलं होती. हा किल्ला अलवरमधील सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. 

Alwar Fort : मुघल बादशाह अकबरने मुलगा सलीम याला ज्या किल्ल्यात नजरकैद केलं होतं तो किल्ला अलवरमधील बाल किल्ला आहे. हा किल्ला अलवर या नावानेही ओळखला जातो. अरावलीच्या डोंगरामध्ये असलेल्या या किल्ल्याची भिंत संपूर्ण डोंगरावर पसरलेली आहे. १ हजार फूट उंचीवर असलेल्या या किल्ल्याचं निर्माण हसन खान मेवाती यांनी केलं होती. हा किल्ला अलवरमधील सर्वात जुन्या इमारतींपैकी एक आहे. 

किल्ल्याची बनावट

हा किल्ला त्याच्या बनावटीसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. ५ किलोमीटर लांब आणि १.५ किलोमीटर रूंग बाल किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी ५ दरवाजे आहेत. या किल्ल्यात जलमहल, निकुंभ महल, सलीम सागर, सूरज कुंड आणि काही मंदिरांचा पडलेला पाहता येऊ शकतो. किल्ल्याच्या आत जवळपास ३४० मीटर उंचीवर १५ मोठे आणि ५१ छोटे टॉवर लावण्यात आले आहेत. किल्ल्यात ८ मोठे बुर्ज आणि तोफांसाठी ४४६ छिद्रे आहेत. तसेच या किल्ल्यात राम मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे. 

बाल किल्ल्याचा इतिहास

१५५१ मध्ये हसन खान द्वारे तयार करण्यात आलेल्या या किल्ल्याची शान आजही तशीच कायम आहे. या किल्ल्यावर मुघलांसोबतच मराठा आणि जाट शासकांनीही शासन केलं होतं. शेवटी १७७५ मध्ये कच्छवाहा राजपूत प्रताप सिंह यांना किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला होता. 

किल्ल्यात फिरण्याची वेळ

किल्ल्याच्या सुंदरतेचा आनंद तुम्ही सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजेपर्यंत घेऊ शकता. तसा तर अलवरमध्ये फिरण्यासाठी सर्वात चांगलं वातावरण ऑक्टोबर ते मार्च महिन्यात असतो. पावसाळ्यातही इथे फिरण्याची एक वेगळी मजा असते. 

कसे पोहोचाल?

अलवरला पोहोचण्यासाठी नवी दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सर्वात जवळ आहे. जयपूर ते अलवर अंतर सामान्यपणे १६२ किमी आहे. जयपूर आणि दिल्ली सोबतच उत्तर भारत आणि राजस्थानच्या वेगवेगळ्या शहरातून अलवरसाठी रेल्वेही आहेत. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके