- अमृता कदमयावेळेस वीकेन्डला जोडून स्वातंत्र्यदिन आला आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला चार दिवसांचा वीकेन्ड मिळतोय. अनेकांनी खूप आधीपासूनच या सुटीचं नियोजन करून मस्त ट्रीप प्लॅन केलेली असेल. तुमचंही फिरण्याचं नियोजन झालं असेल तर उत्तम! पण नसेल झालं तर आता ऐनवेळेस कुठे जायचं, सगळीकडचं बुकिंग फुल झालं असेल, आता आपल्याला महाग डील मिळतील असली कारणं देऊन फिरायला जाणं टाळू नका. अजूनही काही गोष्टींचा नीट विचार करून प्लॅनिंग केलंत तर ऐनवेळेसही स्वस्तात मस्त ट्रीप होवू शकते.
वीकेण्ड ट्रीप प्लॅन करताना..1. ठिकाण काळजीपूर्वक निवडा.
तुम्हाला ट्रेकिंगला जायचं की बीचवर फिरायला जायचंय की एखादं जवळचं हिलस्टेशन गाठायचंय हे आधी नीट ठरवा. प्रवासाच्या वेळेचा विचार करून, बजेट बघून मग तुमच्या सोयीनं प्रवासाचं ठिकाण ठरवा. तिथल्या सगळ्या गोष्टींची माहिती आधीच मिळवा. म्हणजे तिथे गेल्यावरची तुमची वणवण वाचेल आणि वेळही. थोडीशी आॅफ-सीझन जागा निवडा. म्हणजे तुमच्या खिशाला चाट बसणार नाही.
2. वेगवेगळे अॅप्स डाउनलोड करु न घ्या.
तुम्हाला विमान कंपन्यांच्या वेगवेगळ्या आॅफर्सची माहिती हवी असेल तर तुमच्याकडे त्यासंबंधीची वेगवेगळी अॅप्स असणं गरजेचं आहे डिजिटल ट्रॅव्हलच्या वाढत्या ट्रेण्डमुळे तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा स्मार्टफोन्सवरून वेबसाइट्स ब्राऊझ करायच्या आहेत. जेणेकरून तुम्हाला तुमच्या पैशांचा योग्य विनियोग कसा करता येईल हे बुकिंगच्या आधी विविध आॅफर्सची तुलना करून ठरवता येईल. आणि ऐनवेळेस बुकिंग करूनही तुमचा फार खर्च होणार नाही.3. कुकीज क्लिअर करायला विसरु नका
जेव्हा तुम्ही स्वस्त आॅफर्स शोधण्यासाठी सतत संबंधित वेबसाइट्स ब्राऊझ करत असता, तेव्हा या वेबसाइट्स सारखे त्यांचे रेटस बदलत असतात. बर्याचशा वेबसाइट्स तुमची सगळी माहिती लक्षात ठेवतात आणि कुकीजच्या रूपानं त्यांना सेव्ह करु न ठेवतात. त्यामुळे तुमच्या निकडीमुळे तुम्ही वारंवार वेबसाइटला भेट देताहात हे त्यांच्याही लक्षात येतं. शेवटी सतत बदलणारे दर बघून पटकन बुकिंग केलेलं बरं असा विचार करु न मिळेल त्या दराला तुम्ही बुकिंग करु न टाकता. आपली माहिती शक्य तितकी गोपनीय ठेवण्यासाठी थोडी खबरदारी घेण्यात काय हरकत आहे? म्हणूनच जेव्हा केव्हा तुम्ही आॅनलाइन बुकिंगसाठी प्रयत्न कराल तेव्हा तेव्हा कुकीज क्लीन करा.
4. हॉटेलवर काट मारा. बीएनबीचा आॅप्शन निवडा
शेवटच्या क्षणी ट्रीपचं नियोजन करत असाल तर हॉटेल्सचं बुकिंग तुम्हाला महाग पडू शकतं. कारण वीकेण्ड किंवा फिरण्याच्या सीझनमध्ये हॉटेल्सचे दर चांगलेच वाढलेले असतात. त्यामुळे बीएनबीसारख्या राहण्याची सोय करणार्या वेबसाइट्सची मदत घ्या. तिथे तुम्हाला होम स्टे, हॉस्टेल, किंवा रेन्टल होमसारख्या सुविधा सापडतील, ज्या तुमच्या बजेटमध्ये बसणर्या असतीलच पण त्याचबरोबर तुम्हाला तिथल्या स्थानिक लोकांसमवेत मिसळण्याची संधीही मिळेल.5. प्लॅन बी तयार ठेवा
खूप शोधून आणि प्रयत्न करूनही फ्लाइटची तिकिटं बजेटमध्ये बसत नसतील तर दुसरं पर्यायी ठिकाण निवडून ठेवा जिथे तुम्ही बाय रोड जाऊ शकता. यामुळे तुमचे पैसे वाचतीलच पण श्रावणातील निसर्गरम्य वातावरणात एका सुखद रोड ट्रीपचा अनुभवही तुम्हाला मिळेल.6. प्रवासाच्या वेळेचं नियोजन करा.
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे बाय रोड प्रवासाला निघत असाल तर सकाळी लवकर प्रवासाला निघा. कारण ट्रॅफिकच्या गर्दीत अडकून चिडचिड करु न घ्यायची नसेल आणि प्रवास कंटाळवाणा करायचा नसेल तर एखाद्या दिवशी थोडं लवकर उठायला काहीच हरकत नाही.