शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

शिल्लक-राज्याच्या आरटीओची दयनीय अवस्था

By admin | Published: July 30, 2015 11:14 PM

राज्याच्या आरटीओची दयनीय अवस्था

राज्याच्या आरटीओची दयनीय अवस्था
फक्त २ हजार ८१५ जणांवर आरटीओच्या कामाची धुरा
परिवहन आयुक्त कार्यालयातही कर्मचार्‍यांची वानवा
१,२८५ पदे रिक्त
सुशांत मोरे- मुंबई - राज्यात परिवहन आयुक्तालयातंर्गत येणार्‍या आरटीओतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची परिस्थीती सध्या फारच बिकट आहे. वर्षाला साडे पाच हजार कोटींपेक्षाही अधिक महसुल देणार्‍या राज्यातील परिवहन आयुक्त मुख्यालय आणि त्याअंतर्गत येणार्‍या आरटीओत अवघे २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. एवढ्याच अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये राज्याच्या आरटीओचा गाडा हाकत असतानाही त्याकडे कुणाचे लक्ष न जाणे दुदैवच असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
राज्यात आरटीओचा (प्रादेशिक परिवहन अधिकारी) मोठा पसारा आहे. जवळपास ५0 आरटीओ कार्यालय आणि त्याची उप कार्यालये आहेत. यात वाहनांची नोंदणी करणे, लायसन्सचे नुतनीकरण करणे यासह अनेक कामे आरटीओतील अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना करावे लागतात. त्याचबरोबर त्यांच्यावर विशेष मोहीमांचीही जबाबदारी दिली जाते. मात्र अपुर्‍या मनुष्यबळातसुध्दा ही जबाबदारी आरटीओकडून व्यवस्थित पार पाडली जाते. आरटीओतील अधिकारी आणि कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत असतानाच परिवहन आयुक्त मुख्यालयातही अवघ्या काही कर्मचार्‍यांमध्येच कामाचा गाडा हाकत आहेत. याबाबत परिवहन विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले की,राज्यात आरटीओ आणि परिवहन आयुक्त कार्यालयात सध्या २ हजार ८१५ अधिकारी तसेच कर्मचारी कार्यरत आहेत. २00४ साली ४ हजार १00 पदे मंजुर करण्यात आली होती. दहा वर्षापूर्वी एवढी पदे मंजुर करुनही फक्त २ हजार ८१५ जण कार्यरत असल्याने काम करणे कठीण होऊन बसले आहे. जवळपास १ हजार २८५ पदे ही रिक्त असून ती भरण्यासाठी शासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. महत्वाची बाब म्हणजे सर्वाधिक मोटार वाहन निरीक्षकाच्या १0९ तर सहाय्यक मोटार वाहन निरिक्षकाची ३0६ पदे रिक्त आहेत. त्यानंतर लिपिक-टंकलेखकाची २७४, सहाय्यक रोखपालची ६९, कर अन्वेषकची ६0, वाहन चालकाची १७, परिवहन हवालदार ५९, शिपाईंची ४९ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले.
.........................................

अ,ब,क आणि ड श्रेणीत एकूण ४ हजार १00 मंजुर पदांपैकी २ हजार ८१५ पदेच भरण्यात आली आहेत.

श्रेणीमंजूर पदेभरलेली पदेरिक्त
अ७६१६२२१३९
ब४६२२२४
क२,८६६१,९३0९३६
ड४२७२४११८६
......................................

तसेच रिक्त असलेल्या आणखी काही महत्वाच्या पदांमध्ये प्रादेशिक परिहन अधिकारी एक, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ६, मोटार वाहन अभियोक्ता ९, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीची ११ पदे रिक्त असल्याचे सांगण्यात आले.
..........................................

महत्वाची बाब म्हणजे शासनाकडून नुकतीच नविन भरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे परिवहन आयुक्त कार्यालयाकडून रिक्त पदांची भरती करण्यासाठीचा नविन प्रस्ताव शासनाकडे एक महिन्यांपूर्वीच पाठवण्यात आला आहे.
.................................