इंडोनेशियातील बालीमध्ये तुम्हाला वेगवेगळी मंदिरं बघायला मिळतील, पण एक असंही मंदिर आहे जे नेहमीच जगभरातील पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतं. हे मंदिर पेमुतेरान बीचवर समुद्राच्या आत आहे. त्यामुळे या मंदिराबाबतची उत्सुकता अधिक वाढते.जगातली वेगवेगळी ठीकाणे आपल्या वेगळेपणासाठी आणि सुंदरतेसाठी लोकप्रिय झाली आहेत. त्यातील एक आहे बाली. सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे, चारही बाजूंनी हिरवळ या ठिकाणाच्या सौंदर्यात भर पाडतात. इथे हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि अॅडेवेंचर अॅक्टिविटीचा भरपूर आनंद तुम्ही घेऊ शकता. त्यासोबतच आणखी एक गोष्ट म्हणजे येथील समुद्रातील मंदिर.
इंडोनेशियतील आयलॅंड बाली येथे गेलात तर येथील समुद्राखाली असलेलं मंदिर आवर्जून बघा. तशी तर इथे खूप मंदिरं आहेत पण या मंदिराची बातच वेगळी आहे. पेमुतेरान बीचवर समुद्रात ९० फूट खाली असलेलं हे मंदिर आजही कुतुहलाचा विषय आहे.
हे मंदिर फार जुनं आहे. तसं हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे, पण यात विष्णूच्या मूर्तीही आहेत. या मूर्ती ५ हजार वर्ष जुन्या आहेत. लोक स्कूबा डायविंग आणि स्मीमिंगच्या माध्यमातून हे मंदिर पाहिलं जाऊ शकतं. भगवान शिव आणि विष्णूसोबत या मंदिरात गौतम बुद्धांच्याही अनेक भव्य मूर्ती आहेत.
बालीचं वेगळेपण
येथे बहुतेक लोक (९० टक्के) हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात. हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ज्यांचे कला, संगीत, नृत्य आणि मंदिर आकर्षक आहेत. वर्षभरात या बेटावर विविध उत्सव साजरे केले जातात,हे उत्सव पारंपरिक कॅलेंडर अनुसार साजरे केले जातात.