केरळला God's Own Country नावानेही ओळखलं जातं. कारण येथील नैसर्गिक सुंदरता दुसरीकडे कुठेही बघायला मिळत नाही. येथील जंगलांसोबतच बीच देखील इंटरनॅशनल बीचपेक्षा कमी नाहीत. जर तुम्हालाही निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायला आवडत असेल तर इथे तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील असा अनुभव नक्कीच मिळेल. उन्हाळ्यात तर इथे आवर्जून जायला हवं कारण इथे तुम्हाला उन्हाळा तेवढा जाणवणार नाही. या दिवसात इथे फिरण्यासाठी कोणती ठिकाणे बेस्ट ठरतील याची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत.
मरारी बीच
(Image Credit : TripAdviso)
अलेप्पीपासून ११ किमी अंतरावर असलेल्या या बीचबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. ही ठिकाण फार सुंदर आणि डोळ्यांना आराम देणारं आहे. हे ठिकाण फार कुणाला माहीत नसल्याने इथे गर्दीही कमी राहते. इथे राहण्यासाठी आजूबाजूला पर्यायही अनेक आहेत. कवळणारा समुद्र किनारा आणि शांत वातावरण यामुळे इथे तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
चेंब्रा शिखर
जर तुम्ही ट्रेकिंगचे शौकीन असाल वायनाडमधील चेंब्रा शिखर तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे. समुद्र सपाटीपासून २१०० मीटर उंचीवर असलेल्या या ठिकाणावर थरारक अनुभव घेऊ शकता. ज्या लोकांना ऑफबीट ठिकाणांवर जाणे पसंत आहे अशा लोकांना इथे वेगळा अनुभव मिळेल. पण ट्रेकिंगला जाण्याआधी तुम्हाला फॉरेस्ट ऑफिसरची परवानगी घेणे गरजेचे आहे. सकाळी जाऊन सायंकाळी परत यावं लागेल कारण इथे कॅम्पिंगची परवानगी नाही.
सायलेन्ट व्हॅली नॅशनल पार्क
सायलेन्ट व्हॅली नॅशनल पार्क त्याच्या नावाप्रमाणेच मिस्टीरिअस आहे. असे मानले जाते की, साऊथ इंडियातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक हे ठिकाण आहे. हे ठिकाण पलक्कड जिल्ह्यातील नीलगिरीच्या डोंगरात आहे. निसर्गप्रेमींसोबतच वाइल्ड लाइल लवर्ससाठी हे ठिकाण नक्कीच पैसा वसूल ठरेल.
इडाक्कल गुहा
जर तुम्हाला केरळमध्ये ऑफबीट ठिकाणांवर सैर करायची असेल तर तुम्ही वायनाडच्या इडक्कल गुहेला भेट द्यावी. हे ठिकाण इतिहास आवडणाऱ्यांना नक्कीच पसंत पडेल. जर तुम्हाला इथे आणखीही अनोळखी ठिकाणांवर जायचं असेल तर तुम्ही ४ हजार फूटपर्यंत डोंगरात ट्रेक करू शकता.
कुम्बलांबी
कोच्ची शहरापासून काही अंतरावर कुम्बलांबी एक सुंदर छोटंसं गाव आहे. इथे जास्त मच्छिमार लोक राहतात. या ठिकाणाबाबत अनेक वर्ष फार लोकांनी काही माहितीच नव्हती. हे गाव इको टुरिज्म घोषित करण्यात आल्यानंतर या गावाची लोकप्रियता वाढली. या गावात फार सुंदर होमस्टे आणि गेस्ट हाऊस आहेत.