(Image Credit : TravelTriangle)
सध्या डेस्टिनेशन वेडिंगचं फॅड सगळीकडेच बघायला मिळतं. पण सेलिब्रिटींप्रमाणे इटली, पॅरिसमध्ये जाऊन हाय बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करावं गरजेचं नाहीये. भारतातही अशी काही खास ठिकाणे आहेत जिथे तुम्ही बजेटमध्ये याचं प्लॅनिंग करु शकता.
डेस्टिनेशन वेडिंगसाठी जागेचा शोध घेणं खरंच एक कठिण काम आहे. आधीच लोकप्रिय असलेल्या गोवा, केरळ आणि राजस्थानमध्ये तुम्ही नेहमीसाठी लक्षात राहीत असं लग्न करु शकता. पण त्यासाठी तुम्हाला पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागेल. पण जर काही ठिकाणी बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करता येत असेल तर? भारतातील अशीच काही ठिकाणे तुमच्यासाठी...
ऋषिकेश
(Image Credit : weddingplz.com)
ऋषिकेश डेस्टिनेशन वेडिंगसाठी फारच परफेक्ट ठिकाण मानलं जातं. चोहीकडे असलेली हिरवीगार झाडे, गंगा नदीचं खळखळून वाहणारं पाणी आणि उंचच उंच डोंगर तुमच्या वेडिंग फोटोंना वेगळाचा लूक मिळवून देतील. इतकेच नाही तर इथे अनेक हॉटेल्सही आहेत, जिथे तुम्हाला वेडिंगसाठी आकर्षक ऑफरही दिल्या जातात. जर तुम्हाला आणकी कमी बजेटमध्ये लग्न करायचं असेल येथील वेगवेगळी आश्रमं सुद्धा उपलब्ध होऊ शकतात.
वाराणसी
(Image Credit : www.omgitsmywedding.com)
वाराणसी सुद्धा यासाठी फार चांगलं ठिकाण ठरु शकतं. गंगेच्या किनारी सुंदर डेकोरेशन करुनही तुम्ही हे लग्न यादगार करु शकता. वाराणसी हे ठिकाण बजेटच्या दृष्टीकोनातूनही चांगलं ठरु शकतं. राहण्यापासून ते खाण्या-पिण्याच्या सर्वच सुविधा इथे उपलब्ध आहेत.
उत्तराखंड
(Image Credit : tripadvisor.com)
उत्तरखंडमध्येही नैनीताल, मसूरी, मनाली, शिमला, देहरादून सारखी ठिकाणे केवळ करणाऱ्यांच्याच नाही तर या लग्नात सहभागी होणाऱ्या लोकांच्याही नेहमीसाठी लक्षात राहतील. इथे तुम्ही कमीत कमी बजेटपासून ते हाय बजेटमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करु शकता. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. जे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार निवडू शकता.
केरळ
(Image Credit : Wedding Planners in Kochi)
आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी लोकप्रिय असलेलं केरळही डेस्टिनेशन वेडिंगसाठी परफेक्ट डेस्टिनेशन ठरु शकतं. इथे मुन्नार, कोव्वलम बीच सारखी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही पूर्ण एन्जॉय करु शकता.
शेखावती
(Image Credit : Booking.com)
हे राजस्थानमधील सुंदर आणि ऑफ-बीट डेस्टिनेशनपैकी एक आहे. इथे उदयपूर आणि जोधपूर इतका पैसा खर्च करावा लागत नाही. पण तरी सुद्धा सेलिब्रेशन रॉयल पद्धतीने करता येतं. शेखावतीमध्ये वाड्यात तुम्ही लग्नाचा वेगळा फील घेऊ शकता. हे येथील सर्वात लोकप्रिय वेडिंग डेस्टिनेशनपैकी एक आहे.
हिमाचल प्रदेश
(Image Credit : Himachal Pradesh)
डेस्टिनेशन वेडिंगसाठी तुम्ही हिमाचल प्रदेशमध्येही प्लॅन करु शकता. कसौल, मलाना, मनाली, डलहौजीसारख्या ठिकाणी तुम्ही हे सेलिब्रेशन करु शकता. त्यासोबतच इथे खूपसारे मंदिरं आहेत जिथे तुम्ही लग्न करु शकता.