कुठेही फिरायला जाण्याचं प्लॅनिंग सुरु झालं की, सर्वात मोठा प्रश्न पडतो की जायचं कुठं? जास्तीत जास्त लोकांना शहरातील रोजच्या धावपळीपासून दूर रिलॅक्स व्हायचं असतं. त्यामुळे अशा जागेच्या शोधात सगळेजण लागतात. त्यामुळे आम्हीचं हे काम सोपं करत आहोत. आम्ही तुमच्यासाठी अशा एका आयलंडची माहिती घेऊन आलो आहोत, जिथे तुम्ही तुमची सुट्टी मनसोक्तपणे एन्जॉय करु शकता. हे आयलंड आहे माजुली आयलंड.
आसामच्या ब्रम्हपुत्रा नदीच्या मधोमध असलेलं हे माजुली हे जगातलं सर्वात मोठं नदी द्वीप आहे. माजुलीला आसामची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. गुवाहाटीपासून २०० किमी पूर्वेला असलेल्या माजुली आयलंडला पोहोचण्यासाठी बोटीने जावं लागतं. कारण येथील नदींवर पूल नाहीत. बोटीतून जातांना तुमचा प्रवास मनाला आनंद देणारा होतो.
माजुली आयलंडवर काय आहे खास?
ब्रम्हपुत्रा नदीच्या मधोमध ८७५ वर्ग किमीमध्ये पसरलेलं माजुली एक ऑफ बीट डेस्टिनेशन आहे. २०१६ मध्ये या आयलंडचं गिनीज बुक ऑफ वर्ल़्ड रेकॉर्डमध्ये सर्वात मोठ नदी द्वीप म्हणून नाव नोंदवलं आहे. जर तुम्हाल निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासोबतच कला आणि इतिहासाची आवड असेल तर हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. येथील आणखी एक खास गोष्ट म्हणजे येथील घरे. येथील प्रत्येक घरात एक बोट बघायला मिळेल. पूरस्थितीमध्ये येथील लोक या बोटींनाच आपलं घर बनवतात.
रास उत्सवाचा रंग
कार्तिक महिन्यात इथे उत्सव होतात. तर त्याचवेळी नोव्हेंबरमध्ये इथे रास उत्सवाचं आजोजन केलं जातं. ३ दिवसांपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. नोव्हेंबरमध्ये तुम्ही इथे आल्यास या खास उत्सवाचा भाग होऊ शकता.
माजुलीच्या आजूबाजूला फिरण्यासाठी काय?
बाईक रेंटवर घेऊन तुम्ही येथील तांदळाची शेती, छोटी सुंदर गावे फिरू शकता. गावातील लोक रस्त्याच्या बाजूला काहीना काही कलाकृती तयार करताना तुम्हाला दिसतील. यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या वस्तूंची तुम्ही इथे खरेदीही करु शकता.
सत्र यात्रा
अनेक लोकांसाठी माजुली हे आयलंड अनेक पवित्र स्थळांपैकी एक आहे. या आयलंडवर एकूण २२ सत्र आहेत. सत्र हे वैष्णव पूजास्थळांना म्हटलं जातं. माजुली आसामच्या नवीन वैष्णव संस्कृतीचं केंद्र आहे.
आयलंडवर बघू शकता सुंदर पक्षी
माजुली आयलंड वेगवेगळ्या सुंदर पक्षांसाठीही लोकप्रिय आहे. येथील काही भागात पेलिकन्स, स्कॉर्क्स, सायबेरियन क्रेन्स आणि व्हीसलिंग टील्ससारखे पक्षी बघायला मिळतात. त्यासोबतच आणखीही काही प्राणी बघायला मिळतात.
कसे पोहोचाल?
हवाई मार्ग - जोहराट येथील सर्वात जवळील एअरपोर्ट आहे. जवळपास सर्वच मोठ्या शहरांमधून इथे येण्यासाठी फ्लाइट उपलब्ध आहेत. तसे गुवाहाटीपर्यंत तुम्ही फ्लाइट बुक करु शकता. येथून माजुली आयलंडपर्यंतचं अंतर २६५ किमी आहे.
रस्ते मार्ग - जोहराट येथूनच माजुलीसाठी रस्त्यामार्गे जाता येऊ शकतं. येथून आसाम स्टेट टूरिझमच्या बसेस असतात. त्यासोबतच प्रायव्हेट बसेसही उपलब्ध असतात.
योग्य वेळ कधी?
तसे तर या आयलंडवर तुम्ही कधीही जाऊ शकता. पण नोव्हेंबर ते मार्च दरम्यान इथे जाणं योग्य ठरतं. कारण या काळात इथे पाण्याचा स्तर जास्त नसतो आणि सोबतच या काळात इथे मायग्रेटरी पक्षी बघायला मिळतात. जुलै ते सप्टेंबरमध्ये म्हणजे पावसाळ्यात हे आयलंड जवळपास पाण्यात बुडालेलं असतं.