(Image Credit : ZME Science)
अनेकांना वेगवेगळ्या ठिकाणांवर फिरायला जाण्यासोबतच अॅडव्हेंचरस काहीतरी करायचं असतं. अर्थातच भारतात यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र काहींना भारताबाहेरही जाण्याची आवड असते. त्यामुळे अॅडव्हेंचर एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी परदेशातील काही पर्याय घेऊन आलो आहोत. ब्राझील, ग्रीनलॅंड, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ही ठिकाणे पर्यटकांना अॅडव्हेंचरसाठी आकर्षित करत असतात. चला जाणून घेऊ या ठिकाणांची खासियत...
वाइल्ड लाइफ एन्जॉयमेंटसाठी पॅनटेनल
ब्राझीलमध्ये वाइल्ड लाइफ एन्जॉय करण्यासाठी पॅनटेनल हे फारच उत्तम ठिकाण आहे. इथे जगातली सर्वात जास्त पाण्याची जमिन आहे. इथे वेगवेगळ्या प्रजातींची झाडे बघायला मिळतात. पॅनटेनल हे ठिकाण ५४ हजार ते ७५ हजार मैल परिसरात पसरलेलं आहे. जवळच पराग्वे नदी आहे. इथे फार मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यामुळे येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. पॅनटेनलमध्ये फिरायला जाण्यासाठी ऑगस्ट महिना सर्वात चांगला मानला जातो. अॅडव्हेंचरचे इथे इतके पर्याय आहेत की, तुम्ही कधीही येऊन एन्जॉय करू शकता. या ठिकाणाच्या वेगवेगळ्या खासियतमुळे हे ठिकाण यूनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइट्सच्या यादीतही आहे.
ग्रीनलॅंडमध्ये रंगीबेरंगी लाकडांची घरे
ग्रीनलॅंड हे जगातल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. चारही बाजूंनी झाकल्या गेलेल्या ग्रीनलॅंडवर सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडतात तो नजारा बघण्यासारखा असतो. हा नजारा कोणत्या पेंटीगपेक्षा कमी नसतो. येथील खासियत म्हणजे येथील घरे सिमेंट आणि वीटांपेक्षा रंगीबेरंगी लाकडांनी तयार केलेली असतात. ही घरे दिसायला लहान दिसतात, पण आत भरपूर जागा असते. या ठिकाणी सुद्धा तुम्ही अॅडव्हेंचरचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
शानदार वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हे ठिकाण सुद्धा फारच सुंदर मानलं जातं. समुद्री जीव, डोंगर, हिरवळीने गजबजलेल्या या शहराला यूनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. अॅडव्हेंचरची आवड असणाऱ्या लोकांच्या यादीत हे ठिकाण टॉपवर असतं. किंग्स पार्क, ज्वेल केव, मंकी मिया, द पिनेकल, वुल्फ क्रीक, ट्विलाइट बीच आणि हॉरिजॉन्टल वॉटरपार्क हे येथील फिरण्यासाठी लोकप्रिय ठिकाणे आहेत.