या विकेंन्डला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या एका सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणी तुम्ही कमीतकमी खर्चात आपल्या कुटूंबासोबत एन्जॉय करण्यासाठी जाऊ शकता.
दापोली हे महाराष्ट्रातील सुंदर हिलस्टेशन आहे. या ठिकाणी वर्षभर थंडिचं वातावरण असतं. या ठिकाणी अनेक किल्ले आणि गुहा आहेत. ज्यामुळे पर्यटक नेहमी या ठिकाणाकडे आकर्षीत होत असतात. यामुळेच या ठिकाणाला मिनी महाबळेश्वर सुद्धा म्हणतात. अनेक महान लोकांचे या ठिकाणी निवासस्थान सुद्धा आहे. या ठिकाणी तुम्हाला समुद्र किनारे आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद घेता येईल. या ठिकाणचं सी फूड तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणी फिरण्यासारखे काय काय आहे. (हे पण वाचा-यादगार हनिमूनसाठी बेस्ट ठरू शकेल 'हे' डेस्टिनेशन, पुन्हा पुन्हा जायची होईल इच्छा)
केशवराज मंदिर
या ठिकाणी पेशवेकालीन संस्कृतीचे आणि वास्तूकलेची अनेक उदाहरणं आहे. या ठिकाणचे वातावरण खूप शांततामय आहे. केशवराज या ठिकाणी जाण्यासाठी लहानसा रस्ता आहे. या रस्त्यातून चालत असताना काजू, नारळ, आंबे आणि सुपारीची अनेक झाडं लागतात. ( हे पण वाचा-डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातली ही शहरं आहेत बेस्ट)
येथे गरम पाण्याचा झरा सुद्धा आहे. उन्हेरे हे नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी सुप्रसिद्ध आहे. या पाण्यात एक अनोखा सुगंध येत असतो. या पाण्यात अनेक औषधी गुण आहेत. जे त्वचेला होत असलेल्या आजारपणांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. जवळच घनदाट जंगल आहे. या ठिकाणच्या पर्वतामध्ये महादेवाचे मंदिर सुद्धा आहे. या पर्वतांना लागूनच असलेली लहानशी नदी भौगोलीकदृष्या सौंदर्य प्रधान करते.
मुरूड किनारा दापोलीपासून १० किमी वर आहे. याला मुरुड-हर्णे असे देखील म्हणतात. मुरूड किनाऱ्यावरील वाळू मऊ आहे, झुलणारे माड आणि सुंदर दुर्गा देवी मंदीर येथे आहे. चालणे, जॉगिंग किंवा केवळ भटकंतीसाठी हा किनारा अतिशय योग्य आहे. मुरुड हे भारत रत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्म स्थान आहे.हर्णे बंदर दापोलीपासून १५ किमी आहे. इथे दररोज होणारा माशांचा लिलाव प्रसिद्ध आहे. हर्णे इथे अनेक किल्ले आहेत, सुवर्णदुर्ग, फतेहगड, आणि गोवा किल्ला, बंदराजवळच लाईट हाऊस आहे. कनकदुर्ग किल्ल्याच्या सर्वोच्च बिंदूवर जुने लाईटहाऊस आहे.
केळशी हे लहानसे गाव रायगड जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. हे गाव पाण्याने वेढलेले असल्यामुळे एखाद्या बेटासारखे दिसते. इथे सुप्रसिद्ध महालक्ष्मी मंदीर, गणेश मंदीर आणि सुंदर किनारा आहे.
दापोलीला पोहोचण्यासाठी असा करा प्रवास
मुंबई ते दापोली येण्यासाठी तुम्हाला जर तुम्हाला विमानाने प्रवास करायचा असेल तर रत्नागिरी डोमेस्टिक एअरपोर्ट तुम्हाला सगळ्यात जवळचा पर्याय असेल. हे एअरपोर्ट दापोलीपासून १२७ किमीच्या अंतरावर आहे. तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर खेड सगळ्यात जवळचे स्टेशन आहे. खेडपासून दापोली २९ किलोमीटर आहे. कारने जात असाल तर खूपच सोयीस्कर पडेल. दापोली ते मुंबई जवळपास २२० किलोमीटर आहे. पुण्यावरून जवळपास १८२ किमी दूर आहे.