शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

सारखं त्याच त्याच ठिकाणी जाऊन कंटाळलात? हिवाळ्याचा दुप्पट आनंद देईल 'हे' ठिकाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2019 12:12 PM

हिवाळा सुरू झाला आहे .तसंच नाताळ आणि न्यू ईअरच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी फक्त काही आठवडे राहीले आहेत.

हिवाळा सुरू झाला आहे .तसंच नाताळ आणि न्यू ईअरच्या सुट्ट्या सुरू होण्यासाठी फक्त काही आठवडे राहीले आहेत. तर घरी राहून बोअर होण्यापेक्षा आजचं प्लान बनवा. नेहमी त्याच त्याच ठिकाणी फिरायला जाऊन कंटाळा आला असेल. तर आज आम्ही तुम्हाला भारतातल्या अशा ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्याठिकाणी तुम्ही या आधी कधीही गेला नसाल, आणि जिथे गेल्यानंतर तुम्हाला थंडीचा दुप्पट आनंद घेता येईल.  चला तर मग जाणून घेऊया कोणतं आहे ते ठिकाण.

 गंगटोक हे पर्यटन स्थळ भारतातील सिक्कीम राज्यात आहे. गंगटोक भारतातील सर्वात स्वच्छ पर्यटन स्थळ म्हणून ओळखलं जात. शिवाय इथली पर्यटनस्थळं आणि व्यवस्थाही खूपच चांगली आहे. इथे सर्वात महत्त्वाचं बघण्याचं ठिकाण म्हणजे नथू-ला. त्यासाठी तुम्हाला परमीट घ्यावं लागतं, जे गंगटोकला मिळतं. इथे मध्ये लागणारा छांगू लेक हा अतिशय नयनरम्य आहे. शिवाय इथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही त्यामुळे तुम्हाला तिथे प्रसन्न वाटतं. गंगटोकमध्ये तुम्ही कुठेही पाहिलं तर तुम्हाला हिमालयाच्या रांगा दिसतात. 

हिमालयाच्या कुशीमध्ये वसलेलं अत्यंत सुंदर आणि शांत राज्य म्हणजे सिक्किम. सिक्कीम जितकं शांत आहे तितकंच ते नयनरम्य आहे. सिक्किममधील निसर्ग हा अतिशय मनमोहक आहे. त्यामुळे मोठ्या सुट्टीमध्ये सिक्कीमला जाणं हा खूपच चांगला पर्याय आहे. या ठिकाणी नेपाळी, भूतिया आणि लेपचा या जमातीचे लोकमोठ्या संख्येने राहतात. सिक्कीमचे रस्ते हे डोंगरदऱ्यातून जाणारे असल्यामुळे अरूंद आहेत. चीनच्या सीमेला हे लागून असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर सैन्याची लोकं असतात.

मुंबईवरून रेल्वेने कोलकाता मग तिथून जलपाईगुडी आणि मग गंगटोक असा एक पर्याय आहे. पण हा प्रवास खूपच मोठा आहे. .तसंच  तुम्ही विमानाने सरळ गंगटोकजवळील बागडोगरामध्ये उतरा. आणि मग तिथून गंगटोकला जाऊ शकता.  सिक्कीमची ही राजधानी साधारणतपणो ५ हजार चारशे १0 फूट उंचीवर आहे. गंगटोकला तुम्हाला सुमो अथवा जीप असा पर्याय निवडून सिक्कीम फिरता येतं. या ठिकाणी बसची सोय नाही. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सIndiaभारत