बॉलिवूड चित्रपट आणि त्यामध्ये दाखवण्यात येणारी खास ठिकाणं हे समीकरणचं. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आधीपासूनचं लोकेशनचा फार विचार करण्यात येतो. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये विदेशांमध्ये जाऊन शुटींग करण्याचा ट्रेन्ड फार जोमात होता. आता त्यामानाने परदेशवारी करावी लागत नाही. कारण देशातच शुटींग करण्यासाठी अनेक खास लोकेशन्स सहज उपलब्ध होतात. सध्या मुंबई व्यतिरिक्त दिल्ली-एनसीआर, उत्तराखंड, जम्मू-कश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गोवा यांसारख्या प्राइम लोकेशन्सवर शुटींग करण्यात येते.
जर तुम्हीही या शहरांच्या आसपास राहत असाल किंवा या शहरांना भेट देत असाल तर तुम्हालाही शूटिंग पाहण्याची संधी सहज उपलब्ध होऊ शकते. जाणून घेऊया अशा काही शहरांबाबत जे शुटींगसाठीच नाही तर पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहेत.
1. जम्मू-कश्मीर
जम्मू-कश्मिर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट या ठिकाणी शूट करण्यात आले आहेत. बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा गाजलेला 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाची शुटींग याच भागांमध्ये करण्यात आली होती. बर्फवृष्टीमुळे येथील काही ठिकाणं पर्यटकांव्यतिरिक्त शूटिंगसाठी परफेक्ट आहे.
2. राजस्थान
राजस्थान एक रॉयल जाग आहे, जेथे ऐतिहासिक महाल आणि हवेल्या आहेत. ज्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी निवडण्यात आली आहेत. चित्रपटांमध्ये बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडच्या शूटिंगसाठीही राजस्थान उत्तम डेस्टिनेशन आहे. राजस्थानमध्ये अनेक शहरं आहेत. जिथे अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांची शूटिंग सुरू असते. जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, जैसलमेर, माउंट आबू आणि कोटा यांसारख्या जागांवर चित्रपटांची शूटिंग करण्यात येते.
3. मुंबई
अनेकदा आपण ऐकतो की, दररोज अनेक तरूण-तरूणी जीवाची मुंबई करण्यासाठी येत असतात. मुंबईशिवाय बॉलिवूड अधुरं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बॉलिवूडचं मुख्य केंद्रच मुंबई आहे. अनेक चित्रपटांची शुटिंग येथे होत असते. मुंबईमध्ये अनेक लोकेशन्श आहेत. जसं जुहू बीच, गेटवे ऑफ इंडिया, महालक्ष्मी, धोबीघाट, कुलाबा आणि फिल्म सिटी इत्यादी जागांवर शुटींग सुरूच असते. तसेच अनेक पर्यटकही या जांगावर फिरण्यासाठी येत असतात.
4. दिल्ली
राजधानी दिल्लीही कोणत्याही इतर शहरांच्या तुलनेत शूटिंग लोकेशनच्या बाबतीत मागे नाही. मागील अनेक वर्षांमध्ये येथे अनेक चित्रपटांची शूटिंग करण्यात आली होती. लाल किला, कुतुब मीनार, दिल्ली एयरपोर्ट, पुरानी दिल्ली, चांदनी चौक आणि अनेक अशी ठिकाणं आहेत जी पर्यटकांसोबतच शूटिंगसाठीही महत्त्वाची समजली जातात.
5. पंजाब
पंजाबमधील अमृतसर शूटिंगसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. ज्यामुळे चित्रपटांमध्ये पंजाबी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. पंजाबी संस्कृतीही प्रेक्षकांना भूरळ घालत असते. त्यामुळे पंजाबमधील गावांचं सौंदर्य अनेक चित्रपटांमध्ये दाखविण्यात येत आहे.
6. गोवा
गोवा समुद्रकिनाऱ्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. दूधसागर फॉल अत्यंत प्रसिद्ध आहे. जे चित्रपटांच्या शूटिंगसाठी सर्वात प्राइम लोकेशन मानलं जात. गोव्याचं सौंदर्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे भेट देत असतात.