- अमृता कदमप्रवासाहून परत येताना तिथे काढलेल्या फोटोंच्या रूपातून आपण खूप सारे आनंदाचे क्षण आणि आठवणी सोबत घेवून येत असतो. . फोटोंच्या रूपानं हा आनंद आपल्यासोबत कायम राहतो. आता तर सोशल मीडियामुळे आपण आपले प्रवासातली धमाल मस्ती, मेमोरेबल क्षण चटकन, अगदी त्याचक्षणी आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करु शकतो. तुम्हीही जर ट्विटर, फेसबुक आणि स्पेशली इन्स्टाग्रामवर तुमचे प्रवासाचे अनुभव फोटो रुपानं शेअर करणार असाल तर या टीप्स आवर्जून वाचा आणि वापरून पाहा. इन्स्टाग्रामसाठी परफेक्ट फोटो क्लिक करायला तुम्हाला त्यांची नक्की मदत होईल. आणि तसंही केवळ स्वत:च्याच वेगवेगळ्या पोझेस शेअर करण्यात काय मजा? इन्स्टाग्रामवर तुमच्या फोटोंच्या रूपानं अख्खा ट्रॅव्हललॉगच शेअर करता येतो पण त्यासाठी ते फोटो अधिक उत्तम कसे येतील, फोटोच आपल्या प्रवासाबद्दल कसे बोलतील यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतातचं!
इन्स्टाग्रामसाठी परफेक्ट फोटो क्लिक करताना.. 1. प्रकाश आणि सावलीचं भान ठेवा- तुमचे प्रवासाचे फोटो काढताना नैसर्गिक उजेडाचं आणि सावलीचं भान बाळगा. एडिटिंंगअॅप वापरु न तुमच्या फोटोंना आकर्षक बनवण्यापेक्षा नॅचरली काढलेले फोटो अधिक आॅथेंटिक तर वाटतातच पण त्याचबरोबर तुम्ही जिथे फिरायला गेला आहात त्याठिकाणंच खरखुरं सौंदर्यही त्या फोटोंमध्ये कॅप्चर होतं. त्यामुळे प्रवासाला निघण्याच्या आधी तुमच्या कॅमेऱ्यातले फीचर्स माहित करु न घ्या आणि फोटोग्राफीची लाइट-शॅडोतली गंमत समजून फोटो काढा. 2. तुमच्या फोटोंना डेप्थ देण्याचा प्रयत्न करा. हो हे फोटोग्राफीतलं आर्टिस्टिक स्किल आहे, पण थोड्याफार प्रयत्नानं ते तुम्हाला नक्कीच जमू शकतं. त्यामुळे तुमचे फोटो जास्त जिवंत वाटतात. 3. केवळ सेल्फी काढत राहण्यापेक्षा तुम्ही जिथे फिरायला गेला आहात तिथल्या स्थानिक गोष्टींचं संस्कृतीचंही प्रतिबिंब तुमच्या फोटोंमध्ये दिसेल याची काळजी घ्या. तिथला बाजार, रस्ते, खाद्यपदार्थ आणि तिथले लोकंही तुमच्या फोटोंमध्ये येऊ द्या. तुमच्या फोटोंनाच तुमची ट्रॅव्हल डायरी बनून बोलू द्या. 4. लँडस्केप फोटोंना उठाव तेव्हाच येतो जेव्हा त्यामध्ये व्यक्तीही असतील. त्यामुळे लँडस्केप फोटो काढण्याचा विचार करताना ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 5. तुम्ही जेव्हा समुद्रसपाटीपासून उंचावर असाल तर तिथल्या निसर्गसौंदर्याचे फोटो काढताना एरियल अँगल्सचा वापर आवर्जून करा. तुम्हाला तुमच्या फोटोचा हॉरिझन अधिक रुंद मिळतो आणि फोटोमध्येही निसर्गसौंदर्य अधिक खुलून येतं. 6. तुमच्या फोटोंसोबत वेगवेगळे प्रयोग करायला अजिबात कचरु नका. स्केल्सचा विचार करून फोटो काढण्याचा प्रयत्न करा म्हणजे ते फोटो पाहताना तुमचा अनुभव पुन्हा एकदा जिवंत होईल.