(image credit- outlook india)
मुरूड जंजिरा हा ऐतिहासिक किल्ला १७ व्या शतकात तयार करण्यात आला होता. आकर्षक रचनेसह तयार करण्यात आलेला हा किल्ला ३५० वर्षापांसून समुद्राच्या लाटासह उभा आहे. मुंबईपासून सुमारे १६५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. या ऐतिहासिक मह्त्वप्राप्त असलेल्या किल्ल्याचे नाव कोकणी आणि अरेबिक अशा दोन शब्दांना मिळून तयार झाले आहे.
समुद्रापासून ९० फिट उंचावर तयार झालेल्या या किल्ल्याची खासियत अशी होती की समुद्राच्या मधोमध हा किल्ला तयार झाला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेला हा किल्ला असा एकमेव आहे. ज्याला कोणीही जिंकू शकले नव्हते. ब्रिटीशांपासून, पोर्तुगीजांपर्यंत, मुगल, छत्रपती शिवाजी महाराज, तसंच कान्होजी आंग्रे, आणि संभाजी महाराज यांनी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणीही हा किल्ला जिंकण्याच्या प्रयत्नात सफल झाले नाही. त्यामुळे एक वेगळी ओळख या किल्ल्याची आहे.
३५० वर्ष जुन्या असलेल्या या किल्ल्याला 'अजेय किल्ला' सुद्धा म्हटलं जातं होत. या किल्ल्याची खासीयत अशी होती की त्या किल्ल्याचे दरवाजे भिंतीच्या आत बनवले होते. म्हणून सहज दिसून येणारे नव्हते. या गोष्टीमुळे या किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी आलेले शत्रु किल्ल्यांपर्यंत येऊन हल्ला करू शकत नव्हते.
हा किल्ला अहमदनगरचे मलिक अंबर यांच्या देखरेखीखाली तयार झाला. हा किल्ला तयार होण्यासाठी २२ वर्षांचा कालावधी लागला. हा किल्ला २२ एकरात पसरला आहे. २२ सुरक्षा चौकी या किल्ल्यात आहेत. तसंच ४० फिट उंच भिंतीनी घेरलेला आहे. या ठिकाणी सिद्दीकी शासनकर्त्यांच्या अनेक तोफा ठेवल्या आहेत. ( हे पण वाचा-वाघ आणि हत्तीची कुत्र्यासोबत मैैत्री? विविध प्रकारच्या प्राण्यांचे प्रेम आणि मैत्री पाहून व्हाल अवाक्!)
या किल्ल्यात पाण्याचा तलाव सुद्दा आहे. सगळ्यात खास गोष्ट ही आहे की हा किल्ला समुद्राच्या खारट पाण्यामध्ये उभा असून सुद्धा या किल्ल्यात असलेल्या तलावातील पाणी गोड आहे. हे पाणी गोड का आहे. याचं रहस्य अजून उलगडलेलं नाही. सध्याच्या काळात मोठया प्रमाणावर पर्यटक या किल्ल्याला भेट देण्यासाठी जातात.( हे पण वाचा-पार्टनरसोबत बीचवर एन्जॉय करायला गोवा नाही तर जवळचं असलेल्या 'या' ठिकाणाला द्या भेट)