डोंबिवली: रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय.स्थानकातच माती, सिमेंट तसेच अन्य सामग्री टाकण्यात आल्याने त्याची सर्वत्र धुळ पसरत आहे. येणा-या प्रयेक लोकलमागे धुरळा होत असून त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पूर्वेला राहणारे हेमंत दातार यांनी नाराजी व्यक्त सांगितले की, संबंधित कंत्राटदाराने ही काळजी घ्यायची असते, जेव्हा काम सुरु नसते तेव्हा सामान झाकुन ठेवायचे असते, जेणेकरुन लोकलमागे धुळ उडणार नाही. तसेच स्थानकातील बाकड्यांसह ऊपाहारगृहामधील अन्नपदार्थावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीत काम झाल्यावर सकाळी धुळ साफ करणे, बाकडे साफ करणे आवश्यक असते, रेल्वे प्रशासनानेही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. प्रवाशांना सुविधा देतांना त्यांना त्रास होणार नाही याची काळजी का घेतली जात नाही असा सवाल दातार यांनी केला.नेहमी प्रशासनाला सर्व बाबी प्रवाशांनीच सांगायच्या आणि त्यानंतर सुधारणा का केल्या जातात. संबंधित अधिका-यांनी तातडीने या गैरसोयीकडे लक्ष द्यावे आणि सुधारणा करावी असे मतही दातार यांनी व्यक्त केले.रात्रंदीवस ती धुळधाण स्थानकात सुरु असते, त्यामुळे स्थानकात सर्वत्र धुळीचे लोट असतात, दिवसा उजेडात ते दिसून येत नसले तरी रात्रीत तो धुरळा दिसून येतो. श्वास घ्यायला त्रास होतो असेही ते म्हणाले.
डोंबिवली स्थानकात धुरळयामुळे प्रवासी हैराण : फलाटांची उंची वाढवण्याच्या सामानामुळे धुळधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 7:00 PM
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटांची उंची वाढवणच्या कामाला डोंबिवली रेल्वे स्थानकात सुरुवात झाली आहे. फलाट क्रमांक २ वरील कामाला आठवडाभर सुरुवात झाली आहे. त्या कामासाठी स्थानकात आणलेल्या सामानाचा धुरळा उडाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतोय.
ठळक मुद्देकाम झपाट्याने करण्याची मागणीश्वास घ्यायला त्रास होतो