तुम्ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी तुम्ही सुंदर ठिकाणाच्या शोधात असाल, तर तुमचा शोध संपला म्हणून समजा. आजा जाणून घेऊयात हिमाचलमधील काही अशा ठिकाणांबाबत ज्या तुमचा प्लॅन आठवणीत राहण्याजोगा करण्यासाठी तुम्हाला मदत करतील. शिमला, मनाली, धर्मशाला आणि कसौलीबाबत तुम्ही फार ऐकलं असेल. परंतु हिमाचलमधील काही डेस्टिनेशन असे डेस्टिनेशन्स आहेत जिथे फिरल्यानंतर तुमची आणखी कुठेही जाण्याची इच्छा होणार नाही.
चंद्रताल सकाळी चंद्रतालचं दृश्य फार आकर्षक असतं. या ठिकाणी रात्री थांबण्यासाठी टेन्टची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी रात्री थांबणं म्हणजे जणू हिमालयाच्या कुशीत विसावण्यासारखचं आहे. जर तुम्हाला कॅम्पिंगचा अनुभव घ्यायचा असेल तर चंद्रताल परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
खज्जियार खज्जियारला भारतातील छोटं स्वित्झर्लन्ड म्हटलं जातं. जर तुम्ही मनाला शांतता देणारी आणि प्रसन्न करणाऱ्या डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर खज्जियारला अवश्य भेट द्या. रोमँन्टीक जागा आणि देवदारच्या झाडांसोबतच सुंदर तलावांचाही अनुभव घेऊ शकता.
चितकुलइंडो-चायना बॉर्डरजवळ असलेल्या या गावामध्ये प्रदुषणाचं नावही दिसणार नाही. येथील जवळपास सर्वच घरं लाकडाची आहेत. हे गाव निसर्गसौंदर्याने परिपूर्ण आहे.
डलहौजीहिमाचल प्रदेशमधील सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणजे डलहौजी. येथे आल्यानंतर पर्यटक येथील निसर्गसौंदर्यामध्ये हरपून जातात. येथे पाहण्यासाठी कालाटोप, सतधारा, झंदरीघाट आणि खाजिहार यांसारखी ठिकाणं आहेत.