जगभरात अनेक तलाव आहेत. ज्यांची सुंदरता मनाला आनंद देणारी असते. आज आम्ही तुम्हाला अशा तलावाबद्दल सांगणार आहोत. त्या तलावाच्या आत संपूर्ण जंगल तयार झालं आहे. तुम्ही जमिनीवरच्या जंगलं पाहिली असतील पण आत्ता या पाण्यातल्या जंगलाबद्दल जाणून घ्या.
या पाण्यातील जंगलात झाडं सरळ नाही तर उलट्या दिशेने उगवली आहेत. हा आगळावेगळा तलाव कजाखस्तानमध्ये आहे. याचं नाव लेक कॅंडी' असं आहे. या तलावात वेगवेगळ्या प्रकारचे लाकडाचे खांब उभे राहीले आहेत. ही लाकडं अर्ध्योपेक्षा जास्त पाण्यात बुडालेली आहेत.
असं म्हणतात की १९११ मध्ये या परिसरात खूप मोठा भूकंप झाला होता. ज्यामुळे संपूर्ण परिसर अस्ताव्यस्त झाला आहे. त्यामुळे हा पूर्ण परिसर पाण्याने भरलेला आहे. या ठिकाणचे जंगल सुद्धा पाण्याखाली गेले. समुद्राच्या तळापासून २००० मीटरवर असलेला हा तलाव खूप थंड पाण्याने व्यापलेला आहे.
या तलावातील थंड पाण्यामुळे ही झाडं सुद्धा बर्फाळलेली असतात कजाखस्तानच्या सगळ्यात मोठया शहरांपैकी असलेल्या अल्माटी या शहरापासून २८० किलोमीटर अंतरावर हे तलावातील जंगल आहे. हा लेक कँडी कजाखिस्तानतच्या पर्यटनाचे आकर्षण आहे. ( हे पण वाचा-आई शप्पथ! घुबड आणि चिऊताईचा 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्की बॉसचा चेहरा आठवेल...)
तुम्ही या ठिकाणी फिरायला जाऊ शकता. हिवाळ्यात या तलावात आईस डायविंग आणि मासे पकडण्यासाठी सुद्धा लोक जातात. रात्रीच्यावेळी या तलावाचा परिसर खूप भयावह वाटत असतं. ( हे पण वाचा-बापरे! सापाने गिळलेला अख्खा टॉवेल डॉक्टरांनी काढला कसा ? व्हिडीओ व्हायरल.....)