फिरायला जाण्यासाठी काहीतरी नवीन आणि आकर्षक शांतता असलेल्या ठिकाणाच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला एका सुंदर ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. ज्या ठिकाणाला तुम्ही जगातल्या आश्चर्यांपैकी आठवं आश्चर्य म्हणू शकता. चला तर मग जाणून घेऊया चॉकलेट हिल्सबद्दल. या ठिकाणी भेट दिल्यानंतर तुम्ही पर्यटनाचा आनंद घेण्यासोबतच नवीन गोष्टी पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
फिलिपीन्सच्या बोहोल या ठिकाणी चॉकलेट हिल्स आहेत. या पर्वतांची सुंदरता आणि अद्भूत दृश्य पाहून या ठिकाणाला जगातील आठवं आश्चर्य असं म्हणतात. हे पर्वत सागबयान, बतूआन, कारमेन, बिलार, सिएरा बुलोन्स आणि वैलेन्सिया या शहरात पसरलेले आहे.
या पर्वतानां चॉकलेट हिल्स का म्हणतात.
या चॉकलेट हिल्स चुना आणि दगडांपासून तयार झालेल्या आहेत. गवताने संपूर्ण झाकलेले सुद्धा आहे. या ठिकाणच्या गवतांचा आकार त्रिकोणी असतो. तसंच जवळपास सगळ्यांच दगडांचा आकार सारखाच असतो. उन्हाळ्यात जेव्हा हे गवत सुकतं तेव्हा ते चॉकलेटी रंगांच दिसतं. तसंच लांबून पाहिल्यानंतर ते चॉकलेट सारखं दिसत असतं. त्यामुळे या पर्वतांना चॉकलेट हिल्स म्हणतात. या ठिकाणी १ हजार २६८ या संख्येपेक्षा जास्त चॉकलेटी पर्वत आहेत. यांचा आकार सुद्दा त्रिकोणी आहे.
या ठिकाणी दोन रिजॉट तयार करण्यात आले आहेत. एक कारमेन शहरात आहे. दुसरा सागनबाग पीक या नावाने ओळखला जातो. त्यापैकी कारमेन शहरात असलेला जूना आहे. या ठिकाणी जुने कॉम्पलेक्स आणि हॉटेल्स सुद्धा आहेत.
जगातील आठवं आश्चर्य
या ठिकाणाला वैज्ञानिक महत्त्व आहे. तसंच या ठिकाणचे सुंदर दृश्य तसंच वेगळेपण यामुळे या ठिकाणाचा समावेश जगातील आठव्या आश्चर्यात होतो. फिलिपीन्सच्या राष्ट्रीय भूविज्ञानी कमिटीकडून तीसरे राष्ट्रीय भूविज्ञानी स्मारक देण्यात आले आहे.
या ठिकाणी कसं पोहोचायचं
चॉकलेट हिल्सपर्यंत जाण्यासाठी कारमेन टाउन किंवा सागबयान या ठिकाणाहून बस उपलब्ध असतात. वॅनचा वापर करून तुम्ही या ठिकाणी जास्तवेळ घालवू शकता.
या पर्वताशी निगडीत काही समज प्रचलित आहेत. असं म्हटलं जातं की दोन राक्षसांमध्ये भांडण झाली होती. मग त्यानंतर त्यांनी एकमेकांवर चिखल उडवायला सुरूवात केली. अनेक दिवस ही राक्षसं लढत होती. नंतर जेव्हा ते थकले त्यावेळी त्यांनी आपला वादविवाद बंद केला. पण दगड आणि चिखल तसाच राहिला. त्यामुळे या पर्वतावर असे दृश्य निर्माण झाले.