शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अ‍ॅडव्हेंचर्स, योगाभ्यास आणि निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी ऋषिकेश ठरतं बेस्ट डेस्टिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 6:07 PM

वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला असून मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्य लागल्या आहेत. अशातच तुम्हीही या समर व्हेकेशनमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट डेस्टिनेशनबाबत सांगणार आहोत.

(Image Credit : Goibibo)

वातावरणातील उकाडा प्रचंड वाढला असून मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्य लागल्या आहेत. अशातच तुम्हीही या समर व्हेकेशनमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला एका भन्नाट डेस्टिनेशनबाबत सांगणार आहोत. येथे फिरण्यासाठी तुम्हाला जास्त पेसे खरचं करावे लागणार नाही. तसेच उकाड्याने हैराण करणाऱ्या वातावरणापासून दूर तुम्ही अल्हाददायी गारव्याचा अनुभव घेऊ शकता. या दिवसांमध्ये तुम्ही ऋषिकेशला फिरण्यासाठी जाऊ शकता. येथे तुम्ही निसर्गसौंदर्यासोबतच अ‍ॅडव्हेंचर्सचाही अनुभव घेऊ शकता. 

ऋषिकेश उत्तराखंडमधील अगदी सुंदर शहर आहे. जे गंगा नदीच्या किनाऱ्यावर हिमालयाच्या कुशीत वसलेल आहे. जास्तीत जास्त लोकांना येथे होणाऱ्या रिवर राफ्टिंगबाबतच माहीत असतं. पण येथे बंजी जंपिंग, योगा, एयर सफारी, कॅम्पिंग, ट्रेकिंग यांसारख्या अनेक अ‍ॅडव्हेंचर्स गोष्टी करू शकता. 

ऋषिकेशला वर्ल्ड योगा कॅपिटलचा दर्जा देण्यात आला आहे. योगाभ्यास करण्यासाठी येथे जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक येत असतात. येथे अनेक योगा स्कूल आणि जुने आश्रम आहेत. जिथे तुम्ही योगाभ्यास करू शकता. येथे अनेक मासिक, वार्षिक तसेच साप्ताहिक प्रोग्राम्सही अरेंज करण्यात येतात. येथे सकाळच्या वेळी अनेक लोक गंगा नदीच्या काठावर योगसाधना करताना दिसतील. 

(Image Credit : Thrillophilia)

तुम्हीही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही येथे ट्रेकिंग करू शकता. हिरवळ, झरे, शुद्ध हवा तुम्हाला दुसऱ्या जगामध्ये घेऊन जाइल. तुम्हाला आणखी अ‍ॅडव्हेंचर्स करायचे असतील तर तुम्ही कुटुंब आणि वॉटरफाल ट्रेकिंगचा प्लॅन करू शकता. लक्ष्मण झूलापासून 3 किलोमीटर अतंरावर असलेल्या बद्रीनाथ हायवेपासून नीरगढ वॉटरफॉलची ट्रेकिंग सुरू होते. 

अ‍ॅडव्हेंचर लव्हर्ससाठी राजाजी नॅशनल पार्कमध्ये जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता. याव्यतिरिक्त येथे एयर सफारीदेखील सुरू झाली आहे. 

(Image Credit : Uttarakhand Tourism)

ऋषिकेशमधील मुख्य आकर्षण म्हणजे, लक्ष्मण झुला होय. गंगा नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याला जोडणारा लक्ष्मण झुला येथे येणाऱ्या पर्यकांना आपल्याकडे आकर्षित करतो. हा पूल दगड-मातीचा नाही. तुम्ही ज्यावेळी यावरून जाता त्यावेळी हा एखाद्या झोपाळ्याप्रमाणे झुलतो. त्यामुळेच याला लक्ष्मण झुला असं नाव देण्यात आलं. लक्ष्मण झुला 1939मध्ये तयार करण्यात आला होता. असं सांगण्यात येतं की, गंगा नदी पार करण्यासाठी लक्ष्मणाने येथे एक पूल बांधला होता.

दरम्यान, त्रिवेणी घाट, त्र्यंबकेश्वर मंदिर, भरत मंदीर, वशिष्ठ गुफा, गीता भवन यांसारखी ठिकाणं फिरण्यासारखी आहेत. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सtourismपर्यटन